भोकरला केबल टाकण्याचे काम निकृष्ट, वरीष्ठांनी लक्ष घालण्याची मागणी
मुळाप्रवरेच्या जुन्या विज वाहक तारापेक्षा ही कमी उंचीवर नवी केबल? अंदोलनाचा इशारा

भोकर ( वार्ताहर –चंद्रकांत झुरंगे )

– श्रीरामपूर तालुक्यातील भोकर गावठाण हद्दीत विजेचा अनाधिकृत वापर थांबविण्यासाठी व नियमीत होणारे बिघाड टाळण्यासाठी महावितरणकडून केबल टाकण्याचे सुरू असलेले काम अतिशय निकृष्ट दर्जाचे व धिम्या गतीने सुरू असल्याने ग्रामस्थांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्याच बरोबर हि केबल अनेक ठिकाणी अतिशय कमी उंचीवर असल्याने भविष्यात या केबलचा ग्रामस्थांना मोठा त्रास होणार असल्याने या कामात वरीष्ठांनी लक्ष घालून नियमाप्रमाणे उंचीवर केबल टाकावी अन्यथा अंदोलनाचा इशारा ग्रामस्थांकडून देण्यात आला आहे.
ग्रामीण भागात असलेले झाडे व विज वाहक तारांवर आकडे टाकून वापर करण्याचे प्रमाण मोठे असल्याने अशा भागात प्लास्टीक आवरण असलेली विज वाहक तार म्हणजेच केबल टाकण्याचे काम सुरू आहे. संबधीत कर्मचारी आपल्या सोयीनुसार येवून त्या भागातील विज पुरवठा खंडीत करून अतिशय धिम्या गतीने काम करत असल्याने ऐन उन्हाळ्यात ग्राहकांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागत आहे. त्याच बरोबर परीसरातील छोट्या व्यावसायीकांना विजे अभावी हातातवर हात धरून बसण्याची वेळ येत आहे तर या कामाच्या निमीत्ताने खंडीत होणार्‍या विज पुरवठ्यामुळे गावातील नळ पाणी पुरवठा योजना ही कोलमडली आहे.
एकीकडे या केबलमुळे ज्यांचेकडे अधिकृत कनेक्शन नव्हते ते लोक तातडीने महावितरणकडे नवीन कनेक्शनची मागणी करून कागदपत्रांसाठी धावाधाव करून निर्धारीत रक्कम भरणा करून संबधीत कर्मचार्‍यांकडे तातडीने अधिकृत विज जोडणी करण्यासाठीची धावपळ करताना दिसत आहे हा महावितरणचा फायदा होत आहे त्यामुळे अनाधिकृत वापर थांबून अधिकृत कनेक्शन मुळे महावितरणच्या उत्पन्नात वाढ होताना दिसत आहे.
मात्र दुसरीकडे कमी उंचीवर विज वाहक तारा पसराविणारी संस्था म्हणून ख्याती असलेल्या महावितरणच्या कारीारात येथे तशीच अवस्था आहे. सध्या केबल टाकण्याचे सुरू असलेले काम करत असताना महावितरणच्या नियमानुसार ज्या ठिकाणी चौक कींवा रस्ता क्रॉसींग असेल तेथे अकरा मिटर उंचीचे खांब उभे करून त्या विज वाहक केबल उंचीवरून नेणे आवश्यक असताना अनेक ठिकाणी मुख्य चौकात जुन्या खांबापेक्षा ही कमी उंचीवर हि केबल बसविली जात आहे. इतरत्र नऊ मिटर उंचीचे खांब वापरणे आवश्यक असताना अनेक ठिकाणी कमी उंचीच्या खांबावर वरचा भाग सोडून जाणीव पुर्वक पोलच्या अध्यावरच्या भागात केबल अडकली जात आहे. तर अनेक ठिकाणी खांबाची आवश्यकता असताना जास्त अंतराकडे दुर्लक्ष करून कुठल्याही अद्यावत साधनाविणा हि केबल ओढून केवळ खांबावर नेवून ठेवण्याचे काम सध्या सुरू आहे.
या निकृष्ट कामामुळे व कमी उचीच्या पोलवर कमी उंचीवर अडकविलेल्या या विज वाहक केबलचा भविष्यात परीसरातून ऊस वाहतुक करणार्‍या प्रत्येक वाहनास मोठा अडथळा निर्माण होणार आहे. त्याच बरोबर बदलत्या काळानुसार होत असलेल्या महापुरूषांच्या जयंतीच्या वेळी व गावच्या यात्रेच्यावेळी तकतराव नामक रथाच्या मिरवणुकीला हि मोठा अडथळा निर्माण होणार आहे.
या बाबात गावातील अनेक ग्रामस्थांनी भोकर सबस्टेशन येथे कार्यरत असलेले महावितरणचे अभियंतासह अनेकांकडे ग्रामस्थांनी संपर्क करून हि बाब निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न केला परंतू संबधीतांना या कामाची पाहणी करण्यास वेळ मिळत नसल्याने ग्रामस्थांत मोठी नाराजी पसराताना दिसत असल्याने या प्रकारात महावितरणच्या वरीष्ठानी लक्ष घालून दुरूस्ती करावी अन्यथा ग्रामस्था अंदोलनाच्या पवित्र्यात असल्याचे दिसत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!