प्राईम अकँडमी ज्युनिअर काँलेजचा निकाल शंभर टक्के

श्रीरामपूर (प्रतिनिधी– राजू काजी )

माऊली प्रतिष्ठान चॅरिटेबल ट्रस्ट संचलित प्राईड अकॅडेमी इंग्लिश मेडीअम स्कूल व ज्युनिअर कॉलेज, भेर्डापूर-वांगी महाविद्यालयाचा शैक्षणिक वर्ष २०२३-२४ चा इयत्ता १२ वी चा निकाल १०० टक्के लागला असुन महाविद्यालयातून १२ वी सुटणाऱ्या विद्यार्थ्यांची ही चतुर्थ बॅच होती.
महाविद्यालयात विज्ञान शाखेमध्ये ८६.१७ टक्के गुण मिळवून थोरात अनुष्का सुनिल हिने प्रथम क्रमांक पटकावला असून त्यापाठोपाठ अनुक्रमे ८४.०० आणि ७७.३३ टक्के गुण मिळवून साळुंके वेदांत भरत आणि जगदाळे रुचिरा शरद यांनी द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविले. माऊली प्रतिष्ठानचे संस्थापक माऊली मुरकुटे व प्राईड अकॅडेमीच्या संस्थापिका तथा पंचायत समिती सभापती वंदनाताई मुरकुटे यांनी यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या. महाविद्यालय व्यवस्थापन समिती, शिक्षक पालक समिती, महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. कोकणे एस. जी., शाळेच्या मुख्याध्यापिका गोटे. पी. वाय., सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच ग्रामस्थ यांनी विद्यार्थांच्या प्रगतीचे कौतुक केले व पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!