जा.वा.आदिक माध्यमिक व उच्च माध्य.विद्यालय खानापूर मार्च 2024 चा निकाल 100 % लागला.

 

प्रतिनिधी — केशव आसने 

मार्च 2024 मध्ये झालेल्या एसएससी बोर्ड परीक्षेचा निकाल नुकताच ऑनलाईन जाहीर झाला आहे. खासदार गोविंदराव आदिक ग्रामीण शिक्षण संस्था संचलित जा.वा.आदिक माध्यमिक व उच्च माध्य.विद्यालय खानापूर या विद्यालयाचा निकाल शंभर टक्के लागला आहे.
कु.आदिक ईश्वरी बाळासाहेब 84 % गुण मिळवून प्रथम , चि.आदिक सार्थक आबासाहेब याने 83.60 % गुण मिळवून द्वितीय व कु.आदिक आरती गोकूळ 83.40% गुण मिळवून विद्यालयामधून तृतीय मिळवलेला आहे.
संस्थेचे सचिव मा.श्री.अविनाशजी आदिक,माजी.लोकनियुक्त नगराध्यक्ष अनुराधाताई आदिक, सहसचिव मा. श्री.जयंत चौधरी,व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मा. हंसराज आदिक व समस्त ग्रामस्थ,पालक,सर्व पत्रकार यांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!