श्री छत्रपती शिवाजी विद्यालयाचा सेमी विभागाचा निकाल शंभर टक्के.
वडाळा महादेव: [ प्रतिनिधी — राजेंद्र देसाई ]
श्रीरामपूर तालुक्यातील वडाळा महादेव येथील रयत शिक्षण संस्थेचे श्री छत्रपती शिवाजी विद्यालयाचा एसएससी परीक्षेमध्ये सेमी विभागाचा निकाल शंभर टक्के लागला असून विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे.
विद्यालयातील कु. पवार चंचल संभाजी या विद्यार्थिनीने 85.80% गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला. तर कु. उघडे पूजा बाबासाहेब ही 83% गुण मिळवून द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण झाली आहे. तसेच कु. जाधव श्रद्धा संतोष ही 82.40% गुण मिळवून विद्यालयात तिसरी आली आहे.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे , त्यांच्या पालकांचे व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे विद्यालयाच्या मार्गदर्शिका आदरणीय मीनाताई जगधने, स्थानिक स्कूल कमिटीचे मान.सदस्य श्री. सुधीर पा. कसार, उद्धवराव पा. पवार ,श्री. राजेंद पा. पवार तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक मान. श्री माळी डी.एन.सर यांनी अभिनंदन केले. विद्यालयातील इ.दहावीच्या सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांना विद्यालयाचे जेष्ठ शिक्षक श्री. बाळासाहेब कसार, सौ. शितल निंभोरे, श्रीम. स्वेजल रसाळ , श्रीम.प्रज्ञा कसार,श्री. संतोष नेहुल.श्री.भास्कर सदगीर,श्रीम. उषा नाईक, सौ. दिपाली बच्छाव, श्री. अविनाश लाटे, सौ.जयश्री जगताप, श्रीम. जिजाबाई थोरात,श्रीम. सुनिता बोरावके, श्री.प्रशांत बांडे, श्री. अशोक पवार, श्री. संदीप जाधव व श्री. भास्कर शिंगटे यांच्याकडून भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.