पोलीस निरीक्षक द्वारका डोके यांचा माहिती पट विद्यार्थ्यांना पाठ्यक्रमात घ्यावा – आचार्य डॉ शुभम महाराज कांडेकर
वडाळा महादेव [ प्रतिनिधी –राजेंद्र देसाई ]
श्रीरामपूर परिसरातील माऊली वृद्धाश्रम या ठिकाणी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते आराध्य दैवत श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर या ठिकाणी विधिवत पूजन करून वृक्षारोपण करण्यात आले तसेच उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गोपुजन गोग्रास विविध कार्यक्रम यावेळी संपन्न झाले प्रसंगी नाशिक येथील पोलीस निरीक्षक द्वारका डोके यांनी जगातील सर्वोच्च शिखर माउंट एवरेस्ट सर केल्याबद्दल तसेच पोलीस दलातील प्रथम महिला व राष्ट्रगीत म्हणण्याचा विक्रम केल्याबद्दल आचार्य डॉ शुभम महाराज कांडेकर यांचे शुभ हस्ते सन्मान चिन्ह सन्मानित करण्यात आले प्रसंगी महा एनजीओ फेडरेशन पुणे अध्यक्ष श्री केतन खोरे माऊली वृद्धाश्रम श्री सुभाष वाघुंडे आरोग्य मित्र सुभाष गायकवाड यांनी पुस्तके देऊन सन्मान केला
प्रसंगी ह भ प डॉ शुभम महाराज कांडेकर यांनी उपस्थित मार्गदर्शन करताना पोलीस निरीक्षक द्वारका डोके यांचा जगातील सर्वोच्च एवरेस्ट शिखर सर करण्याचा माहितीपट शालेय विद्यार्थ्यांना पुस्तकातुन अभ्यासक्रमासाठी उपलब्ध व्हावा यामुळे विद्यार्थ्यांना नक्कीच प्रेरणा जिद् मिळणार आहे तसेच पो नी द्वारका डोके यांनी आई-वडिलांची प्रेरणा जिद्द इच्छाशक्ती या बळावरच एवरेस्ट शिखर सर केले सर्वांचे यासाठी सहकार्य लाभले जगातील एवरेस्ट शिखर सर करून पोलीस दलातील प्रथम महिला तसेच राष्ट्रगीत म्हणण्याचा बहुमान मिळाला आहे याप्रसंगी माऊली वृद्धाश्रमाचे सुभाष वाघुंडे कल्पना वाघुंडे आरोग्य मित्र सुभाष गायकवाड नगरसेवक केतन खोरे संगीत विशारद अवधुत कुलकर्णी महा एनजीओ फेडरेशनचे समन्वयक सुरज सूर्यवंशी ह भ प राजवळ नाना श्री अकोलकर श्री बाबासाहेब उफाड श्री नागेश सुगुर श्री उंडे श्री अरुण विसपुते सौ वंदना विसपुते श्री दत्तात्रेय खिलारी श्री दिनेश जेजुरकर श्री शुभम नामेकर आदी यावेळी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेन्द्र देसाई यांनी केले आभार अध्यक्ष सुभाष वाघुंडे यांनी मानले