नायब सुभेदार राजेंद्र आढाव सेना दलाच्या प्रदिर्घ सेवेतून निवृत्त

 

श्रीरामपूर [ प्रतिनीधी– राजेंद्र देसाई ]

 

तालुक्यातील खैरी निमगांव येथील रहिवासी राजेंद्र आढाव सैन्य दलाच्या ‘ प्रदिर्घ सेवेतून निवृत्त झाले निमित्त खैरी निमगांव चितळी रोड येथील साई समर्थ लॉन्स येथे सेवा पूर्ती सोहळा संपन्न झाला यावेळी विविध मान्यवरांच्या आई वडिलांच्या व त्रिदल सैनिक सेवा संघाच्या हस्ते शहीद स्मारकास रिथ अर्पण करून ( पुष्पचक्र) वाहुन भारत मातेच्या रक्षणार्थ प्राणांची आहुती देणाऱ्या शहीद जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली, दरम्यान शहरातील शहीद स्मारक,मेनरोड, संगमनेर रोड, छत्रपती शिवाजी महाराज चौक, या ठिकाणाहून डीजेवर देशभक्ती पर गीतांची धुन वाजवून भव्य मिरवणूक काढण्यात आली तदनंतर खैरी निमगांव येथील वाघाई देवीच्या मंदिरात पुष्पहार अर्पण करून व दर्शन घेतले सेवा निवृत्ती निमित्ताने अतिशय स्तुत्य उपक्रम म्हणजे वाघाई मंदिर परिसरात दहा ब्रास पेविंग ब्लॉक बसवून परिसराचे सुशोभीकरण करण्यात आले व उर्वरित कार्यक्रम चितळी रोड येथील साई समर्थ लॉन्स मध्ये संपन्न झाला कार्यक्रमाचे प्रास्ताविक त्रिदल सैनिक सेवा संघाचे नगर उत्तर विभागाचे उपाध्यक्ष मेजर कृष्णा सरदार यांनी केले त्यांनी प्रस्ताविकात त्यांचे जीवन चरित्र व्यक्त केले अतिशय गरीब व शेतकरी कुटुंबातून देश सेवेकरिता प्रेरित होऊन सैन्य दलामध्ये क्लर्क ट्रेड घेऊन शेवटी क्लास टू ऑफिसर नायब सुभेदार क्लर्क या पदामधून 21 वर्षे सेवा करून स्वेच्छा निवृत्ती घेतली या प्रसंगी त्रिदल सेवा संघाच्या वतीने यथोचित सन्मान करण्यात आला अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमास त्रिदल सैनिक सेवा संघाचे तालुकाध्यक्ष संग्रामजीत यादव बाळासाहेब बनकर ,रामदास वाणी ,असलम शेख ,बाळासाहेब भागडे ,सुनील भालेराव ,संतोष देवराय , गणेश सोडणार ,मंगेश यादव ,याप्रसंगी दत्तात्रय शेजुळ तहसीलदार धुळे, आदिनाथ झुराळे संचालक अशोक कारखाना ,विलासराव शेजुळ सामाजिक कार्यकर्ते, दत्तात्रय शेजुळ सरपंच खैरी निमगाव ,नितीन भागडे संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती, शिवाजी शेजुळ माजी सरपंच खैरी, राजेंद्र काळे व्हा, चेअरमन कार्यकारी सह, विकास सोसायटी खैरी, भागवतराव मुळे निवृत्त मुख्याध्यापक ,विष्णुपंत शेळके संचालक गणेश सहकारी साखर कारखाना ,केतन खोरे अध्यक्ष मोरया फाउंडेशन श्रीरामपूर, राजेंद्र गोडगे सहाय्यक उपनिरीक्षक श्रीरामपूर, संजय झावरे झावरे शॉकप्स, श्रीकृष्ण शेळके, रामेश्वर आढाव, संतोष आढाव कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मेजर बाळासाहेब बनकर होते त्यांचे अध्यक्षीय भाषण झाले कार्यक्रमाचे सुत्रसंचालन नगर परिषदचे माजी मुख्याध्यापक नवनाथ अकोलकर यांनी केले तर माजी सैनिक राजेंद्र आढाव यांनी सत्काराला उत्तर दिले व आभार प्रदर्शन केले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!