नवीन शैक्षणिक वर्षाची प्रवेशोत्सवाने जल्लोषात सुरुवात

वडाळा महादेव [ प्रतिनिधी — राजेंद्र देसाई ]

श्रीरामपूर तालुक्यातील वडाळा महादेव येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालयात नवीन वर्षाची सुरुवात नवागतांचे स्वागत ,मोफत पाठ्यपुस्तक वाटप व गुणवंत विद्यार्थी सत्कार अशा त्रिवेणी संगमाने करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान स्थानिक स्कूल कमिटीचे सदस्य मान.श्री. सुधीर पाटील कसार यांनी स्वीकारले.विद्यालयाचे मुख्याध्यापक मान.श्री. माळी डी. एन.सर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करून विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक वर्षासाठी शुभेच्छा दिल्या. स्थानिक स्कूल कमिटीचे सन्माननीय सदस्य श्री.उद्धवराव पाटील पवार व श्री.राजेंद्र पाटील पवार यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.मान्यवरांच्या हस्ते नवागतांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. तसेच इयत्ता पाचवी ते आठवीतील सर्व उपस्थित विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात आले. नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात विद्यार्थ्यांना मिष्ठान्न देऊन करण्यात आली.
विद्यालयात एसएससी बोर्ड परीक्षेत प्रथम,द्वितीय व तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या अनुक्रमे कु.चंचल संभाजी पवार,कु.पूजा बाबासाहेब उघडे व कु.श्रद्धा संतोष जाधव या विद्यार्थिनींचा व त्यांच्या पालकांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच मागील वर्षी झालेल्या एन एम एम एस परीक्षेत सारथी शिष्यवृत्तीसाठी कसार शिवराज संतोष ,कसार सार्थक बाबासाहेब, उघडे ओम माधव व चिमखडे सार्थक दिलीप हे विद्यार्थी पात्र ठरलेले आहेत. या विद्यार्थ्यांना सलग चार वर्ष रू.9600 इतकी शिष्यवृत्ती मिळणार आहे. या सर्व विद्यार्थ्यांचे मान्यवरांच्या हस्ते गुलाब पुष्प देऊन अभिनंदन करण्यात आले.’इ.10 वी च्या विद्यार्थ्यांनी अभ्यासाचे नियोजन करा व शिकलेल्या घटकाचा सराव करा’, असे चंचल पवार व पूजा उघडे या विद्यार्थिनींनी आपल्या मनोगतातून सांगितले. आपल्या अध्यक्षीय मनोगतात मान. सुधीर पाटील कसार यांनी विद्यार्थ्यांना शालेय शिस्तीचे महत्त्व पटवून दिले. यावेळी श्री.संभाजी पवार, चि.गौरव संभाजी पवार, श्री.बाबासाहेब उघडे , श्री. प्रतीक पवार,श्री. आसाराम पवार ,जनाबाई जाधव व सावित्रीबाई जाधव इत्यादी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक श्री. बाळासाहेब कसार,सौ.शितल निंभोरे ,श्रीम.स्वेजल रसाळ ,श्री.संतोष नेहूल ,श्री.भास्कर सदगीर,सौ.दिपाली बच्छाव ,श्री.अविनाश लाटे, श्रीम.सुनीता बोरावके ,श्री. प्रशांत बांडे, श्री.अशोक पवार ,श्री. संदीप जाधव व श्री. भास्कर शिंगटे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीम. प्रज्ञा कसार यांनी केले.तर श्रीम. उषा नाईक यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!