सर्वसामान्य जनतेच्या सहकार्यानेच खासदार – खासदार भाऊसाहेब वाकचौरे

वडाळा महादेव [ प्रतिनिधी — राजेंद्र देसाई ]

श्रीरामपूर या ठिकाणी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या विजयाबद्दल श्रीरामपूर येथील मेन रोड वरील श्रावणी कलेक्शन या ठिकाणी विविध संघटना सर्वसामान्य जनतेच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते
यावेळी शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे विजयी खासदार मा भाऊसाहेब वाकचौरे यांनी उपस्थित सर्वांचे आभार व्यक्त करत सर्वसामान्य जनतेच्या सहकार्याने रस्त्यावरील माणूस खासदार होऊ शकतो तसेच मागील कालावधीमध्ये आपण अनेक स्वरूपाचे निधी उपलब्ध करून याचा लाभ सर्वसामान्य जनतेला मिळवून दिला तसेच यापुढेही सर्वसामान्य जनतेसाठी आपला माणूस आपल्यासाठी उपलब्ध असल्याचे प्रतिपादन खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी केले तसेच भविष्य काळात काहीही अडचण तसेच विकास कामासंदर्भात सदैव तत्पर असून यासाठी श्रीरामपूर यासाठी माझे चिरंजीव श्री रोहितदादा वाकचौरे हे आपल्या सेवेसाठी श्रीरामपूर या शहरात वास्तव्य करणार असून श्रीरामपूरकरांचे करावे तेवढे कौतुक व आभार – यापुढे श्रीरामपूरकरांसाठी तन मन धन या सर्व बाबींचा विकास कामासाठी उपयोग करणार असल्याचे मत खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी केले अनेकांनी ज्ञात अज्ञात तसेच
सर्वसामान्य जनतेने मोलाचे सहकार्य केले आहे यावेळी शिवसेना पदाधिकारी अशोक थोरे मामा श्री सचिन बडदे श्री भाऊसाहेब डोळस श्री राधाकिसन बोरकर श्री सदाभाऊ कराड श्री रोहित दादा वाकचौरे श्री दत्ता डोंगरे श्री सदाशिव पटारे महिला आघाडी दुर्गाताई पटारे श्री लखन भगत श्री शिवाजी दौड श्री दत्तात्रेय कचरे श्री बाबा कुसेकर श्री विठ्ठल सोनवणे श्री मच्छिंद्र पठारे श्री प्रदीप मेहत्रे सौ शारदा कदम श्री विष्णुपंत सोनवणे श्री निखिल पवार श्री गणेश थैरनार श्री राजेन्द्र देसाई सौ छाया मुठे श्री लोखंडे आदि मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक सूत्रसंचालन दत्ता डोंगरे सदाशिव पटारे यांनी केले तर आभार शिर्डी लोकसभा मतदार संघ मा खासदार रोहितदादा वाकचौरे यांनी मानले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!