खिर्डी येथे आदिवासी एकता परिषदेची बैठक संपन्न .

 

( प्रतिनिधी — महेश मासाळ )

श्रीरामपूर तालुक्यातील खिर्डी येथे आदिवासी एकता परिषदेची बैठक गावातील ग्रामपंचायत ऑफिस मधील हॉल मध्ये झाली , यावेळी आदिवासी एकता परिषद भारत चे जिल्हा अध्यक्ष मा. श्री देविदास पवार हे अध्यक्ष पदी होते, ते त्यांच्या भाषणात म्हणाले की आपल्या संघटनेचे एकच उद्देश आहे की गावपातळीवरील तळागळातील आदिवासी लोकांचे शासन दरबारातून अनेक लाभ भेटत असतात ते त्या लोकांपर्यंत मिळाला पाहिजे, दुसरी गोष्ट म्हणजे जिल्हा prtc ट्रेनिंग हे मुळशी येथे आहे ती आपल्या जवळच पास व्हावे जेणे करून आपल्या मुलांना त्याच निश्चितच फायदा होईल म्हणून यासाठी संघर्ष करणार असेही ते या वेळी म्हणाले.या बैठकीसाठी आदिवासी एकता परिषदेचे अहमदनगर जिल्ह्याचे दक्षिणेचे जेष्ठ कार्यकर्ते संजू भाऊ गांगुर्डे पारनेर बाळासाहेब गायकवाड नगर राजूभाऊ माळी कानेगाव प्रमोद बर्डे भाऊसाहेब राजपूत पांडुरंग बर्डे दिलीप आहेर दादा माळी भाऊराव गांगुर्डे टाकळीभान रामनाथ फुल माळी सतीश माळी कडवळ माळी माळी चिंचोरे दीपक आहेर बाळासाहेब माळी ग्रामपंचायत सदस्य नामदेव माळी अशोक माळी रोहिदास माळी सुभाष बर्डे कारभारी गायकवाड बाप्पू आहेर गोरख मोरे रोहिदास सोनवणे अशोक ठाकर यांच्यासह महेश मासाळ असे बहुसंख्य कार्यकर्ते या मिटींगला हजर होते या मीटिंगमध्ये आदिवासी समाजाच्या विविध समस्यांवर मार्गदर्शन करण्यात आले व तसेच आदिवासी प्रकल्पाचे योजना या विषयावर चर्चा करण्यात आले व अहमदनगर जिल्ह्यामध्ये आदिवासी एकता परिषदेचे वतीने लवकरच आदिवासी मेळाव्याच्या आयोजन करण्यात येणार आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!