धान्याच्या प्रत्येक लाभार्थीने दि.३० जून
पर्यंत ईकेवायसी पुर्ण करावे – हेमा बडे
श्रीरामपूर येथे स्वस्त धान्य दुकानदारांची तहसीलमध्ये तालुकास्तरीय बैठक संपन्न
श्रीरामपूर / प्रतिनिधी: चंद्रकांत झुरंगे
नाशिक विभागाचे विभागीय आयुक्त व उपायुक्त यांचे मार्गदर्शनाखाली सर्वोच्च न्यायालयात आपल्याकडे धान्य घेत असलेले सर्व लाभार्थी पात्र व सत्य आहेत हि माहीती सर्वोच्च न्यायालयात सादर करावयाचे असल्याने नाशिक विभागाचे विभागीय आयुक्त डॉ. प्रविण देडाम व उपायुक्त प्रज्ञा बडे यांचे मार्गदर्शनाखाली सध्या जिल्ह्यात प्रत्येक स्वस्त धान्य दुकानातून पी एच एच व अन्त्योदय या दोन योजनाचा लाभ घेत असलेल्या प्रत्येक सदस्याचे ईकेवायसी म्हणजेच प्रमाणीकरण करणे बंधन कारक असल्याने धान्य घेत असलेल्या रेशनकार्डधारक व त्यातील सर्व सदस्याचे प्रमाणीकरण दि.३० जुन पर्यंत पुर्ण करावे असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी हेमा बडे यांनी केले आहे.
श्रीरामपूर येथील प्रशासकीय इमारतीतील सभागृह येथे नुकतीच जिल्हा पुरवठा अधिकारी यांचे प्रमुख उपस्थितीत तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदारांची तालुकास्तरीय बैठक नुकतीच संपन्न झाली यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी श्रीरामपूरचे तहसिलदार मिलींदकुमार वाघ, जिल्हा पुरवठा कार्यालयातील अव्वल कारकुन वंदना नेटके व जिल्हा लेखा पर्यवेक्षक सुभाष मांडे, पुरवठा निरीक्षक सुहास पुजारी, अव्वल कारकुन नितीन गरगडे, गोदाम व्यावस्थापक मिलींद नवगीरे, लीपीक योगेश खंडागळे व ई पॉझ मशीनचे समन्वयक सागर पानसरे आदि व्यासपिठावर उपस्थीत होते.
आपल्या स्वस्त धान्य दुकानला जोडलेल्या शिधापत्रिकेतील धान्याचा लाभ घेत असलेल्या प्राधान्य कुटूंब लाभार्थी व अन्त्योदय लाभार्थी कार्डातील प्रत्येक सदस्याचे ईकेवायसी प्रमाणीकरण बंधनकारक असल्याने दुकानदारांनी पुर्णवेळ दुकान सुरू ठेवून वेळेत प्रत्येक कुटूंबातील प्रत्येक सदस्याचे ईकेवायसी प्रमाणीकरण दि.३० जून पर्यंत पुर्ण करावे. ज्यांचे प्रमाणीकरण होणार नाही अशा सदस्यांना धान्यातून वगळले जाणार असल्याने प्रत्येकाने हे ईकेवायसी प्रमाणीकरण वेळेत करवून घ्यावे असे आवाहन यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी हेमा बडे यांनी केले.
तसेच सर्व धान्य दुकानदारांना आता वेळेत धान्य येत आहे. आपल्याकडे असलेल्या प्रत्येक लाभार्थ्यांपर्यंत धान्य पोहचवा, कुणाची तक्रार येणार नाही याची दक्षता घ्या. तहसिलदार व पुरवठा निरीक्षक यांनी ईकेवायसी संदर्भात सतत पाठपुरावा करून वेळेत काम पुर्ण करावे असे ही यावेळी श्रीमती बडे यांनी सांगीतले. श्रीरामपूर तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदारांनी आतापर्यंत चांगले काम केलेले असल्याने या कामात ही आमचा दुकानदार कुठेच कमी पडणार नाही. त्याच बरोबर दुकानदारांनी ही हक्काने मागण्या व अडचणी मांडत असताना आपल्या कर्तव्यात आपण कुठेही कमी पडणार नाही याची दक्षता घेण्याची गरज असल्याचे तहसिलदार मिलींदकुमार वाघ यांनी सांगीतले. यावेळी तालुक्यात ईकेवायसी कामात अग्रेसर असलेले राजेंद्र वाघ यांचे अभिनंदन श्रीमती बडे यांनी केले.
यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष देवीदास देसाई यांनी जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानदारांनी कोरोना काळात स्वत:चा जीव धोक्यात घालून ऑनलाईन धान्याचे वितरण केलेले असताना शासनाकडून कॅरी फॉरवर्ड म्हणजेच महिण्याच्या उशीराने मिळालेल्या धान्याचे कमीशन अद्यापर्यंत दुकानदारांना मिळाले नाही, दुकानदारांनी रोखीने पैसे भरून ते धान्य शासनाच्या आदेशानुसार मोफत वितरण केले ती रक्कम अद्यापर्यंत दुकानदारांन मिळाली नसल्याचे निदर्शनास आणुन दिले.
श्रीरामपूर शहरात गेल्या काही महिण्यापासून सुरू झालेले थेट धान्य योजनेतील धान्य अहमदनगर येथील गोदामातून येत असलेले धान्य उशीराने येते व प्रत्येक योजना निहाय धान्यासाठी स्वतंत्रपणे चार वेळा वाहतुकीची गाडी येते त्यामुळे शहरातील धान्य दुकानदारांना उशीराने धान्य मिळत असल्याने मोठा मनस्ताप सहन करावा लागत असल्याचे जिल्हा सचीव रज्जाक पठाण यांनी सांगीतले तर ईकेवायसी करताना वृद्ध व बालआधार याचे प्रमाणीकरण करताना येणार्या अडचणी चंद्रकांत झुरंगे यांनी मांडल्या तर शासकीय गोदामातून धान्याच्या गोण्याची शिलाई व्यवस्थीत होत नसल्याने धान्य खाली करताना व वाहतुकी दरम्यान धान्याची नासाडी होत असल्याने दुकानदारांचे नुकसान होत असल्याने दुकानदारांच्या घटीला मान्यता द्यावी अशी मागणी करण्यात आली. तसेच गोदामाच्या कामकाजात दुरूस्ती करून पुर्ण वजन मिळावे अशी मागणी यावेळी करण्यात आली. तसेच शासकीय गोदाम हे पत्र्याचे असल्याने व तेथील गोदामांची दुरावस्था झालेली असल्याने घट येत असल्याचे गोदाम व्यावस्थापक यांनी सांगीतले.
यावेळी जिल्हाध्यक्ष देवीदास देसाई, जिल्हा सचीव रज्जाक पठाण, जिल्हा प्रसिद्धीप्रमुख चंद्रकांत झुरंगे, तालुकाध्यक्ष बजरंग दरंदले, लालमोहंमद जहागीरदार, सुभाष चोरडीया, प्रकाश गदीया, दिलीप गायके, अरूण खंडागळे, दिलीप त्रिभुवन, भाऊसाहेब वाघमारे, माणीकराव जाधव, नरेंद्र खरात, अनिल मानधना, चंद्रकांत गायकवाड, राजेंद्र वाघ, सधिर गवारे, योगेश गंगवाल, योगेश नागले, मुरली वधवाणी, बाळकृष्ण कांगुणे, आजीज शेख, बाळासाहेब राठोड, जाकीर शेख, सुनिल पारखे, वासुदेव वधवाणी, विकी काळे, सचीन मानधना, अमोल धाकतोडे, रेखा महांकाळे, शोभा गोरे, साक्षी मैराळ, किरण जाधव आदिंसह तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदार मोठ्या संख्येने उपस्थीत होते.
श्रीरामपूर तहसिल कार्यालय येथे स्वस्त धान्य लाभार्थीचे ईकेवायसी संदर्भात आयोजीत बैठकीत मार्गदर्शन करताना जिल्हा पुरवठा अधिकारी हेमा बडे समवेत तहसिलदार मिलींदकुमार वाघ, वंदना नेटके, सुभाष मांडे व सुहास पुजारी आदि दिसत आहेत.
चंद्रकांत झुरंगे – भोकर