शिंदे -फडणवीस सरकार जनतेच्या
प्रश्नांबाबत सपशेल अपयशी – ससाणे
सरकार विरोधात श्रीरामपूर काँग्रेसचे
चिखल फेको आंदोलन
श्रीरामपूर/प्रतिनिधी: अफजल मेमन
सध्याचे राज्यातील शिंदे- फडवणीस सरकार जनतेच्या प्रश्नांबाबत सपशेल अपयशी ठरले असून सरकारने सर्वसामान्यांच्या प्रश्नांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून जनतेला वेठीस धरले असल्याचे प्रतिपादन जिल्हा बँकेचे संचालक, माजी उपनगराध्यक्ष करण ससाणे यांनी केले. श्रीरामपूर विधानसभा काँग्रेस व स्व.जयंतराव ससाणे मित्र मंडळाच्या वतीने आयोजित भ्रष्ट सरकार विरोधातील चिखल फेको आंदोलन प्रसंगी ससाणे बोलत होते. यानंतर श्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुधीर नवले म्हणाले की, शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही, दूध,कांदा, सोयाबीनचे भाव कमी करून शेतकऱ्यांना वेठीस धरले आहे.
यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस हेमंत ओगले म्हणाले की, जाती धर्माच्या नावाखाली सामाजिक शांतता भंग करण्याचे कारस्थान सुरू आहेत.
याप्रसंगी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या महासचिव दिपालीताई ससाणे म्हणाल्या की, महागाई, बेरोजगारी, महिला सुरक्षा, खते बी बियाणांचा काळाबाजार, कर्जांसाठी शेतकऱ्यांची होत असलेली अडवणूक,ऐन पावसाळ्यात सुरू केलेली पोलीस भरती, परीक्षांना पेपर फुटीचे लागलेले ग्रहण, सरकारी रिक्त पदे भरण्यासाठी चाललेली दिरंगाई यामुळे जनतेमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे.
यानंतर मुरली राऊत, भारत भवार, निलेश भालेराव यांनी आपल्या भाषणातून राज्यातील बिघडलेली कायदा व सुव्यवस्था या विरोधात तीव्र शब्दात टीका केली. यावेळी चिखल फेको आंदोलनाच्या माध्यमातून राज्यातील व केंद्रातील भाजप सरकारचा तीव्र निषेध करण्यात आला. याप्रसंगी काँग्रेसचे अध्यक्ष अण्णासाहेब डावखर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक खंडेराव सदाफळ, राजेंद्र पाऊलबुद्धे, विलास दाभाडे, राजू चक्रनारायण, माजी उपनगराध्यक्ष हाजी मुजफ्फरभाई शेख, दिलीप नागरे, आशिष धनवटे, मुन्नाभाई पठाण, राजेंद्र सोनवणे, रमजान शहा, दत्तनगर चे सरपंच प्रेमचंद कुंकूलोळ, सुरेश भडांगे, साईनाथ वेताळ, प्रताप कवडे, प्रमोद भोसले, रावसाहेब चक्रनारायण, मर्चंट चे निलेश नागले, प्रवीण नवले, सुनील शिरसाट, अमोल शेटे, प्रवीण काळे, रावसाहेब आल्हाट, दत्तात्रय बिबवे, मिथुन शेळके, अशोक जगधने,सुरेश ठुबे, रियाजखान पठाण, रितेश एडके, मनसुख फरगडे, अनिल ढोकचौळे, निलेश बनकर, अतुल खरात, अमोल नाईक, प्रशांत राऊत, गणेश गायधने, वैभव कुऱ्हे, सरबजीतसिंग चूग,बी. एल. साळुंके, किरण कोळसे, अण्णा चव्हाण, मोहन रणवरे, संतोष परदेशी, नवाज जहागीरदार, नजीर शेख, सुनील साबळे, रणजीत जामकर, नवाज शेख, युनुस पटेल, बाबा वायदंडे, भोला दुग्गल, दीपक वमने, प्रसाद चौधरी, बुऱ्हाणभाई जमादार, भैयाभाई अत्तार, वैभव पंडित, जमील शहा, लक्ष्मण शिंदे, अंबादास निकाळजे, शाहरुख पटेल, प्रकाश ताके, हिमांशू गिरमे, बापू तागड, संतोष दिवटे, मच्छिंद्र वाघ, दत्तू काका गुळवे,रमेश गायके, नानासाहेब चक्रनारायण, बाबुराव चक्रनारायण, बाळासाहेब रूपटक्के,मांजरे मामा,संजय गोसावी,विशाल साळवे, किरण खंडागळे, सुरेश शिवलकर, श्रीरंग उपळकर, कुंदन सिंग जुनी, राजेश जोंधळे, आकाश जावळे, अमोल चिंतामणी,सागर दुपाटी, तीर्थराज नवले, श्रेयस रोटे, प्रशांत आल्हाट काँग्रेसचे सहकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.