बार्टी तर्फे वसमत मध्ये संत कबीर
जयंती मोठ्या उत्साहात साजरी.
वसमत / प्रतिनिधी. — मीलिंद आळने
वसमत मध्ये बार्टीकडून संत कबीर दास यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली, महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाची स्वायत्त संस्था डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे. प्रकल्पधिकारी सिध्दार्थ गोवंदे, समतादूत मिलिंद आळणे,गुरूनाथ गाडेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत सर्वप्रथम दिप प्रज्वलन करून संत कबीर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले. यावेळी अध्यक्षस्थानी प्रतिभा खंदारे,सोनी आळणे या शिक्षिका हया प्रामुख्याने उपस्थित होत्या. मोठ्या उत्साहात संत कबीर यांची जयंती साजरी करण्यात आली.
धार्मिक मान्यतेनुसार हा पर्व जेष्ठ महिन्याच्या पौर्णिमेला येतो. संत कबीर दास भक्ती काळातील प्रमुख कवी होते, त्यांनी आपल्या संपूर्ण जीवनात वाईट प्रथा दूर करण्यासाठी काही दोहे आणि रचना केली,संत कबीर दास यांचे आजही दोहे प्रसिद्ध आहेत.संत कबीर यांनी आपल्या जीवनात समाजातील पांढरी अंधविश्वासू लोकांपासून दूर जाण्याचा संदेश दिला. यावेळी इंदूताई खंदारे,अर्चना गजभार,सपना खंदारे, सुरेखा दूध मला,सविता गायकवाड,निकिता गंभीर, शोभा बाई खंदारे,दिपाली गायकवाड,आराधना आळणे आभार प्रदर्शन इंदूताई खंदारे यांनी केले.