प्राणायाम करण्यात सातत्य
असावे – प्रा.रुपाली उंडे
श्रीरामपूर / प्रतिनिधी — अमन सय्यद बेलापूर
प्राणायाम करण्यात सातत्य असावे, दिवसभरातील एक तास आपल्या स्वतःसाठी द्यायला हवा असे उद्गार तालुक्यातील बेलापूर महाविद्यालयातील प्रा. रूपाली उंडे यांनी काढले. बेलापूर येथील कला वाणिज्य महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभाग, क्रीडा विभाग आणि विद्यार्थी विकास मंडळाच्या वतीने नुकताच योग दिन साजरा करण्यात आला त्यामध्ये त्या बोलत होत्या.त्यांनी विद्यार्थ्यांना व प्राध्यापकांना व्यायामाची प्रात्यक्षिके दाखवली.प्राचार्य डॉ.गुंफा कोकाटे यांनी योगदिन साजरा करण्यासाठीची पार्श्वभूमी समजून सांगितली. आपला आहार,योग, प्राणायाम, व्यायाम,चालणे यावर भर द्यायला सांगितले तर डॉ.बाबासाहेब पवार यांनी शारीरिक श्रमाचे महत्त्व विशद केले. डॉ .विनायक काळे यांनी प्रात्यक्षिके व व्यायामाचे महत्त्व पटवून दिले.योग, अनुलोम विलोम, प्राणायाम,शरीराची लवचिकता यात सातत्य कसे ठेवावे हे सांगितले.प्रा.अशोक थोरात यांनी आभार मानले. या कार्यक्रमासाठी सर्व प्राध्यापक प्राध्यापकेतर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते.