काचोळे विद्यालयामध्ये योग
 दिन मोठ्या उत्साहात साजरा

रेड क्रॉस सोसायटी, महसूल अधिकारी आणी शहर पोलिस स्टेशनचा सहभाग

श्रीरामपूर / प्रतिनिधी — अफजल मेमन 

येथील रयत शिक्षण संस्थेच्या डी.डी. काचोळे विद्यालयांमध्ये श्रीरामपूर विभागाचे प्रांताधिकारी किरण सावंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली रेडक्रॉस सोसायटी श्रीरामपूर,शहर पोलीस स्टेशन श्रीरामपूर, महसूल विभाग श्रीरामपूर व डी डी काचोळे माध्यमिक विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक योग दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाचे उद्घाटन श्रीरामपूर शहरातील सुप्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉ. दिलीप शिरसाठ यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी नितीन देशमुख पोलीस निरीक्षक श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन, पीएसआय समाधान सोळंके व मेढे, राजेंद्र सलालकर, मिलिंद वाघ तहसीलदार श्रीरामपूर, योग गुरु डॉ. सी व्ही शेळके, कृष्णा लोळगे, प्रवीण साळवे, विद्यालयाचे मुख्याध्यापक सुनील साळवे यावेळी उपस्थित होते.
याप्रसंगी योग गुरु डॉ. सी व्ही.शेळके यांनी विद्यार्थ्यांना योगाचे जीवनातील महत्त्व, विविध आसनांचे फायदे, स्नायूंची ताकद व लवचिकता याबद्दल सविस्तर माहिती दिली तसेच योग गुरु कृष्णा लोळगे यांनी योगासनांची विविध प्रात्यक्षिके विद्यार्थ्यांना करून दाखवली. त्याचबरोबर शरीर, मन व योगासने यांच्यातील सहसंबंध विद्यार्थ्यांना पटवून दिला.
या कार्यक्रमासाठी विद्यालयाचे शिक्षक संतोष सोनवणे,भाऊसाहेब लोंढे, कांतीलाल शिंदे, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, श्रीरामपूर पोलीस विभागाचे कर्मचारी, तसेच रेडक्रॉस सोसायटीचे सदस्य, सर्व पोलीस अंमलदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांपैकी सर्वांनीच योगा प्रात्यक्षिकामध्ये मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयाचे उपशिक्षक नानासाहेब मुठे यांनी केले. तर विद्यालयाचे मुख्याध्यापक सुनील साळवे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विद्यालयाचे क्रीडा शिक्षक अजित कदम, गोरक्षनाथ आंबेकर, दीनानाथ धनवडे, ज्येष्ठ शिक्षिका स्नेहा निंबाळकर, विद्यार्थी वसतिगृहाचे अधीक्षक महेंद्र भराड विद्यालयाचे कर्मचारी सुहास पांडे व संतोष जगदाळे व शिक्षक वर्ग यांनी मेहनत घेतली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!