वैद्यकीय प्रवेश परीक्षा रद्द करून
नव्याने परीक्षा घ्यावी – आ. कानडे

वैद्यकीय प्रवेश परीक्षेत झालेल्या गोंधळाच्या निषेधार्थ काँग्रेस पक्षाच्यावतीने प्रांताधिकारी कार्यालयासमोर आंदोलन

श्रीरामपूर / प्रतिनिधी — दिपक कदम

वैद्यकीय प्रवेश परीक्षा (NEET) २०२४ रद्द करून नव्याने परीक्षा घेण्यात यावी तसेच या प्रकरणाची संपूर्ण चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी आमदार लहू कानडे यांनी केली.

वैद्यकीय प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या वैद्यकीय प्रवेश परीक्षा (NEET) २०२४ मध्ये मोठ्या प्रमाणात झालेला गोंधळ व गैरप्रकाराच्या निषेधार्थ काँग्रेस पक्षाच्यावतीने आ. कानडे यांच्या नेतृत्वाखाली प्रांताधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करून प्रशासनाला निवेदन देण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी कॉंग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष सचिन गुजर, तालुकाध्यक्ष अरुण पाटील नाईक, जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानेश्वर मुरकुटे, माजी नगरसेवक अशोक नाना कानडे यांच्यासह कॉंग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व विद्यार्थी-विद्यार्थीनी उपस्थित होते.

आ. कानडे म्हणाले, नीट परीक्षेत मोठ्या प्रमाणात गोंधळ व भ्रष्टाचार झाल्याने वर्षभर प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या मुलांवर मोठा आघात झाला आहे. या गोंधळामुळे विद्यार्थ्यांचे भविष्य उध्वस्त होणार आहे. परीक्षेतील हा भ्रष्टाचार पंतप्रधानांना थांबवता आला नाही. एका एका केंद्रावर जेवढ्या मार्कांची परीक्षा झाली त्यात शेकडो विद्यार्थ्यांना १००% गुण मिळाले. गरिबांच्या मुलांनी वैद्यकीय शिक्षण घेऊच नये, म्हणून त्यांच्यावर असा अन्याय केला. केंद्र व राज्य सरकारने स्पर्धा परीक्षांमधील भ्रष्टाचार थांबवून विद्यार्थ्यांच्या भविष्याच्या दृष्टीने न्यायाची भूमिका घ्यावी, नीट परीक्षा रद्द करून पुन्हा घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली.

यावेळी बोलताना सचिन गुजर म्हणाले, या परीक्षेत तब्बल ६७ जणांना ७२० गुण मिळाले आहेत. हरियाणातील एका परीक्षा केंद्रावर सात विद्यार्थ्यांनी त्यांची आडनावे लावली नाहीत. नीटच्या निगेटिव्ह मार्किंग सिस्टीममध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात गुण मिळू शकत नाहीत. मुलांना पेपर उशिरा मिळाल्याने ग्रेस मार्क दिल्याचे स्पष्टीकरण एनटीये ने केले असले तरी पेपर उशिरा मिळालेले हजारो विद्यार्थी असताना दोघांनाच ग्रेसमार्क कसे मिळाले ?, हा सगळा प्रकार व्यवस्थेच्या गहाळपणाचा असल्याचा आरोप गुजर यांनी केला.

नीट परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी दोन वर्ष कठोर मेहनत घेतली. परीक्षेतील या घोटाळ्यामुळे मुलांच्या मेहनतीचा स्वप्नांचा चुराडा झाला आहे. आम्ही मेहनत करून रात्रंदिवस अभ्यास करतो मात्र श्रीमंतांची मुले अभ्यास न करता पैसे देऊन पेपर विकत घेतात.व अधिक गुण मिळवितात. हा आमच्यावर अन्याय असून पालकांनी आमच्यासाठी घेतलेले कष्ट यामुळे वाया जातात. भ्रष्टाचारी लोक आमच्या भविष्याशी, आमच्या कुटुंबाच्या स्वप्नांशी क्रूर खेळ करत आहेत. त्याचा आम्ही विद्यार्थी निषेध करत असून नीट परीक्षा पुन्हा घेण्यात यावी, अशी मागणी कृष्णा निर्मळ या विद्यार्थ्यांने यावेळी केली.
यावेळी सातिष बोर्डे, सचिन जगताप, कार्लस साठे, विष्णुपंत खंडागळे, राजेंद्र कोकणे, सरपंच अशोक भोसले, सुरेश पवार, रमेश आव्हाड, अमोल आदिक, कलीम कुरेशी, मुक्तार शाहा, नानासाहेब रेवाळे, अजिंक्य उंडे, आबा पवार, दीपक कदम, प्रताप देवरे, रज्जाक पठाण, असलम सय्यद, भैय्या शाह, मल्लू शिंदे, दीपक निंबाळकर, शंकरराव फरगडे, बापूसाहेब लबडे, मनसुख फरगडे, विजय शिंदे, बापुसाहेब शिंदे, रफिक शेख, विद्यार्थी कॉंग्रेसचे प्रदेश सचिव अक्षय नाईक, जि. प. चे माजी अध्यक्ष मिस्टर शेलार, मुदस्सर शेख, आशिष शिंदे, निखील कांबळे, सम्राट माळवदे, कल्पेश माने, प्रतिक कांबळे, रवी भांबारे आदी उपस्थित होते.

यावेळी प्रांताधिकारी कार्यालयातील नायब तहसीलदार वनिता कल्हापुरे यांनी निवेदनाचा स्वीकार करून निवेदन वरिष्ठांना पाठविण्याचे आश्वासन दिले. यावेळी शहरातील पँन्टेगाँन करिअर इन्स्टिट्यूट या संस्थेचे विद्यार्थी-विद्यार्थिनी आंदोलनात सहभागी झाले होते. यासाठी संस्थेचे प्रा. तौफिक शेख, प्रा. प्रमोद निर्मळ यांचे सहकार्य लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!