वटसावित्री पौर्णिमा सण उत्सवा निमित्त माता भगिनींच्या रक्षणार्थ श्रीरामपूर पोलीस बांधव तत्पर 

 

वडाळा महादेव [ प्रतिनिधी –राजेंद्र देसाई ]

 

वटसावित्री पौर्णिमा सण उत्सवानिमित्त माता भगिणीच्या रक्षणार्थ श्रीरामपुर शहर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक नितीन देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली श्रीरामपूर शहरात तसेच हद्दीतील गावामध्ये वटसावित्री पौर्णिमा उत्सवानिमित्त ठिकठिकाणी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे येथील शहरातील उत्सव मंगल कार्यालय परिसरामध्ये माता भगिनींची सकाळपासूनच मोठी गर्दी असल्याने पोलीस उपनिरीक्षक समाधान सोळुंखे तसेच दादाभाई मगरे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल राहुल नरवडे रमीज आत्तार गौरव दुर्गुडे यांनी चोख बंदोबस्त ठेवला यावेळी माता भगिनी यांनी पोलीस अधिकारी कर्मचारी यांचे कौतुक व आभार व्यक्त करत आजच्या सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर जसा बंदोबस्त ठेवला यापुढे ही आमच्या संरक्षणासाठी सदैव तत्पर असावे अशी मागणी केली यावेळी पो कॉ राहुल नरवडे यांनी माता भगिणी यांना पोलिस प्रशासनाच्या वतीने आश्वासन दिले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!