रॉयल रिश्ता डॉटकॉम आणी सुसंगम वधू – वर सुचक केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने

श्रीरामपूरात सर्व धर्मिय वधू
वर सुचक केंद्राची स्थापना

रॉयल चॅरिटेबल ट्रस्ट ची सामाजिक कार्य स्तूतीजन्य – शौकतभाई शेख

श्रीरामपूर प्रतिनिधी: राजेंद्र देसाई 

येथील रॉयल चॅरिटेबल ट्रस्ट संचालित रॉयल रिश्ता डॉटकॉम आणी पुणे येथील सुसंगम वधू – वर सुचक केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने श्रीरामपूर शहरात सर्व धर्मीय वधू – वर सुचक केंद्राची स्थापना करण्यात आली असून या निमित्ताने येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील जुने प्रांत कार्यालय (महसूल भवन) या ठिकाणी रॉयल रिश्ता डॉटकॉम कार्यालयात सदरील सर्व धर्मीय वधू – वर सुचक केंद्राचे अनावरण ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्री. विजय नगरकर यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
यावेळी श्रीरामपूर स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे तालुकाध्यक्ष माणिकराव जाधव,समता फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष शौकतभाई शेख, ऍड. मोहसिन शेख , सुसंगम वधू – वर सुचक मंडळाचे संचालक बशीरभाई काझी, जैद फराश,हाजी महंमद इसहाक फराश फाऊंडेशन चे चेअरमन इंतेखाब फराश, फैज मॅसेज ब्यूरो पुणे,तथा मोमीन मॅरेज ब्युरो चे शफीभाई मोमीन, रॉयल रिश्ता डॉटकॉम चे संचालक कलिमभाई शेख,कार्यकारी संचालक हाजी नदीमभाई, सदस्य मुश्ताकभाई शेख, सानिया इनामदार आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

यावेळी बोलताना श्री.विजय नगरकर म्हणाले की वधू -वर सुचक केंद्र यामुळे विवाह करीता आपणास हवे तसे स्थळ मिळण्यात खुपच मदत होते. कारण वर जर डॉक्टर असेल तर त्याची इच्छा असते वधू देखील डॉक्टरच असली पाहिजे,तसेच वकील, इंजिनिअर आणी इतर सर्वच क्षेत्रातील दोन्ही मंडळीकडील अशीच अपेक्षा असते ती यानिमित्ताने इच्छित स्थळ मिळविण्यात मोठी महत्वाची ठरते असेही ते म्हणाले.

याप्रसंगी शौकतभाई शेख म्हणाले की,जरी इच्छित स्थळ नाही मिळाले,किंवा वधू मुलगी ही कमी शिकलेली जरी असली तरी तीच्या शिक्षणाची पुढील जबाबदारी वर पक्षाने घेत तीला पुढील इच्छित शिक्षण देण्यात पुढाकार घेतल्यास नक्कीच इच्छापूर्ती झाल्यावाचून राहणार नाही, यासोबतच विवाह समारंभात जास्त व्यर्थ खर्च न करता थोडक्यात विवाह समारंभ उरकले पाहिजेत,ज्यांच्याकडे आर्थीक स्थिती बरी आहे त्यांनी खर्च केले तरी चालते, मात्र ज्याकडे पुरेसे अर्थीक बजट नाही त्यांनी रिन करुन सण साजरा करत असा कोणताही बडेजाव न करता व्यर्थ कर्जबाजारी होवू नये. किंबाहूना वर पक्षाकडील मंडळीने समजूतदारपणा दाखवत वधू पक्षाच्या परिस्थिती नुसारच विवाह समारंभ आटोपल्यास त्याचा दोन्ही पक्षाला आयुष्यभराचा निश्चितच फायदा पोहोचेल यावर विचार होणे देखील मोठे गरजेचे असल्याचेही ते म्हणाले. तसेच आम्ही अनेक वर्षांपासून बघतो आहोत कलिमभाई शेख आणी त्यांची टीम रॉयल चॅरिटेबल ट्रस्ट च्या माध्यमातून विविध सामाजाभिमुख उपक्रम ही सातत्याने राबवीत असतात, उपेक्षित घटकांतील दुर्लक्षीतांना विविध उपक्रमांच्या माध्यमातून मदतीचा हात पुढे करत असतात, उपेक्षित घटकांना दवाखाना औषधोपचार, विवाह प्रसंगी मदत,अशा प्रकारे अनेक उपक्रम ट्रस्ट च्या माध्यमातून राबविली जातात त्यांची ही समाजसेवा देखील उपस्थित घटकांना मोठ्या फायद्याची ठरली व ठरत असल्याने रॉयल चॅरिटेबल ट्रस्ट ची सर्वच सामाजिक कार्य उपेक्षित घटकांसाठी खुपच फायद्याची ठरली व ठरत असल्याचे ते म्हणाले.

याप्रसंगी रॉयल रिश्ता डॉटकॉम संचालक कलिमभाई शेख आपल्या प्रस्तावीकात म्हणाले की, सुमारे आडीच वर्षांपासून आमचे रॉयल रिश्ता डॉटकॉम हे शहर, तालुका व परिसरात सेवा देत आहे,या माध्यमातून आजवर जवळपास पंधराशे पेक्षा अधिक एच्छिक आणी योग्य स्थळ जमविण्यात यश आले आहे, केवळ रु.९९९ अशा अल्पदरात ही सेवा मिळत असून दिव्यांग बंधू – भगीनींच्या बाबतीत कोणतीच फी अकारली जात नाही,आगदी विनामूल्य त्यांना सेवा दिली जात आहे.
पुणे येथील सुसंगम वधू – वर सुचक केंद्राच्या माध्यमातून यापूढे सर्व जाती- धर्मातील वधू – वरांना उदा.डॉक्टर, इंजिनिअर,सरकारी नोकरीत असलेले, अविवाहित तरुण – तरुणी (वधू – वर), विधवा, परित्याक्ता अशा ऐच्छिक स्थळासाठी सेवा देण्यास आमचे रॉयल रिश्ता डॉटकॉम सदैव तत्पर असुन ज्या कोणास आवश्यकता असेल त्यांनी सेवेसाठी रॉयल रिश्ता डॉटकॉम (सर्व धर्मीय वधू – वर सुचक मंडळ) जुने प्रांत कार्यालय (महसूल भवन) छत्रपती शिवाजी महाराज चौक श्रीरामपूर – मोबाईल क्रमांक: 8055274030/ 9112274030 यावर संपर्क करावा अथवा समक्ष भेट देवून सेवेची संधी द्यावी असेही ते म्हणाले.

या प्रसंगी ऍड. मोहसिन शेख, सुसंगम वधू – वर सुचक मंडळाचे संचालक बशीरभाई काझी,जैद फराश, रॉयल रिश्ता चे मुश्ताकभाई शेख व इंतेखाब फराश, शफीभाई मोमीन आदि
मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले.

यावेळी रॉयल रिश्ता डॉटकॉम चे सदस्य नदीमभाई शेख, श्रीरामपूर जिल्हा संघर्ष समिती चे श्री.राजेंद्र लांडगे, हाफीज अनिसभाई पठाण,
बाभळेश्वर येथील नजीरभाई शेख, मोहसिन ए मिल्लत कमेटी महिला विंग संयोजिका फरजाना बाजी, कमेटी सहयोगी नदिम ताज आदि मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुयोग्य सुत्र संचालन ऍड.मोहसिन शेख यांनी केले तर शेवटी कलिमभाई शेख यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!