अल्पवयीन मुलीस कशाचे तरी आमिष दाखवुन पळुन घेऊन जाणा-या आरोपीस धुळ्यातून घेतले ताब्यात
अपहरित मुलीस आरोपी प्रथम नाशिक, नंतर सुरत व तेथून धुळे येथे नेताना पोलीस पथकाने धुळ्यातुन केली सुटका
( श्रीरामपुर प्रतिनिधी -इमरान शेख )
दि.23/08/2024 रोजी पहाटे 3.45 वा अल्पवयीन मुलगी हीस राहते घरातून कोणीतरी अनोळखी इसमाने अज्ञात करणाकरिता कशाचे तरी अमिष दाखवून फिर्यादीचे कायदेशीर रखवालीतून पळून नेले आहे बाबत राहुरी पोलीस ठाणे गुरनं. 945/2024 बी एन एस कलम 137 (2) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. दाखल गुन्हाचे कुठलेही प्रकारचा मागमूस नसताना गोपनीय बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की इसम नामे सचिन भाऊसाहेब विटनोर वय 26 वर्ष राहणार मानोरी तालुका राहुरी जिल्हा अहमदनगर यांनी सदर अल्पवयीन मुलीस सुरत राज्य- गुजरात येथे अपहरण करून नेले आहे. अशी माहिती मिळाल्याने राहुरी पोलीस स्टेशनचे तपास पथक सुरत राज्य गुजरात कडे जात असताना पुन्हा गोपनीय बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की सदर इसम हा अल्पवयीन मुलीस घेऊन धुळे येथे येत आहे अशी माहिती मिळाल्याने राहुरी पोलीस स्टेशनचे तपास पथकाने धुळे जिल्ह्याच्या हद्दीतून दिनांक 25/8/2024 रोजी धुळे येथील बस स्थानक येथे येत असताना पहाटे 05.00 वा. मिळुन आल्याने त्यास ताब्यात घेऊन अल्पवयीन मुलीची सुटका करुन तीस पालकांच्या ताब्यात देऊन आरोपीस पुढील कारवाई करीता अटक करण्यात आली आहे.
सदर कारवाई मा.राकेश ओला पोलिस अधीक्षक सो, अहमदनगर, मा. वैभव कुलुबर्मे अपर पोलिस अधीक्षक अहमदनगर, मा. बसवराज शिवपूजे उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीरामपुर विभाग जि. अहमदनगर यांच्या मार्गदर्शनाखाली श्री संजय आर.ठेंगे पोलीस निरीक्षक राहुरी पोलीस स्टेशन, सपोनी परदेशी, पोहेकों सुरज गायकवाड, पोहेकों राहुल यादव, पोना/ प्रविण बागुल, पोकॉ/प्रमोद ढाकणे, पोकॉ/ सतीश कुऱ्हाडे, पोकॉ/नदीम शेख, पोकॉ सचिन ताजणे,पोकॉ/ गोवर्धन कदम ,पोकॉ/अंकुश भोसले, पोकॉ/ संतोष राठोड तसेच मोबाईल सेल श्रीरामपुर चे पोना/सचिन धनाड, पोना/संतोष दरेकर यांनी केली आहे सदर गुन्हयाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक परदेशी हे करीत आहेत.