सरकारची एक रुपयात पंतप्रधान पीकविमा योजना म्हणजे लाबडाचे आवतन जेवल्याबिगर खरं नाही – – नीलेश शेडगे
प्रतिनिधी –मुनीर सय्यद
केंद्र व राज्य सरकारने 2028 कोटींची प्रीमियम सबसिडी ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीला अद्यापही दिले नाहीत त्यामुळे नगर जिल्ह्यातील 12 लाख विमाधारक शेतकऱ्यांना 1162 कोटींची पीकविमा नुकसानभरपाई नाही !!
स्वतंत्र भारत पक्ष, शेतकरी संघटना, शेतकरी संघटना महिला आघाडी अहमदनगर यांनी खरीप व रब्बी हंगाम 2023 ची पीकविमा नुकसानभरपाईसाठी गेल्या चार महिन्यांपासून पाठपुरावा करून संघर्ष करत आहेत पीकविमा कंपनीने खरीप हंगाम मधील फक्त सोयाबीन आणि मका पिकांचे नुकसान दावे मान्य केले होते त्यामुळे स्वतंत्र भारत पक्षाने खरीप हंगाम मधील सर्व पिकांचा नुकसाभरपाईमध्ये समावेश करून भरपाई देण्यात यावी यासाठी जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालय येथे टाळे ठोकण्याचा इशारा दिल्यामुळे 20 जून 2024 रोजी जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालय येथे जिल्हा कृषी अधीक्षक श्री सुधाकर बोराळे यांच्या दालनात झालेल्या ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीचे राज्य व्यवस्थापक श्री विनायक दीक्षित यांनी खरिपाचे सर्व पिकांना नुकसानभरपाई देण्याचे मान्य करून जुलै अखेरपर्यंत नुकसानभरपाई देण्याचे लेखी दिले ( साधारण 400 ते 500 रुपये प्रति गुंठा नुकसाभरपाई मिळणार आहे) परंतु जुलै अखेरपर्यंत नुकसानभरपाई न दिल्यामुळे स्वतंत्र भारत पक्ष, शेतकरी संघटना, शेतकरी संघटना महिला आघाडीने 1 ऑगस्ट 2024 रोजी ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीचे मुख्य कार्यालय शिवाजीनगर पुणे येथे टाळे ठोकण्याच आंदोलन केले तेव्हा ओरिएंटल कंपनीचे श्री दीक्षित यांनी आम्हाला राज्य व केंद्र सरकारकडून 2028 कोटींची सबसिडी तीन आठवड्यात येणे आहे ती सरकारने विमा कंपनीस जमा केल्यानंतर 31 ऑगस्ट पर्यंत विमाधारक शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यात येईल असे लेखी पत्र दिले .
आज ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीचे श्री विनायक दीक्षित यांचेशी संपर्क केला असता आज 24 ऑगस्ट रोजी तीन आठवड्यांची मुदत संपूनही सरकारने 2028 कोटी अद्याप दिले नाहीत असे कळविले त्यामुळे स्वतंत्र भारत पक्ष, शेतकरी संघटना, शेतकरी संघटना महिला आघाडीने ही रक्कम सरकारकडून देण्यात यावी यासाठी नगर जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे महसूलमंत्री श्री राधाकृष्ण विखे पाटील यांना स्वतंत्र भारत पक्षाचे जिल्हाध्यक्ष नीलेश शेडगे यांनी समक्ष भेटून निवेदन दिले त्याच बरोबर नगर जिल्ह्यातील सर्व 12 आमदार , 2 खासदार यांना रजिस्टर पोस्टाने सदर निवेदन पाठविले आहे.
31 ऑगस्ट 2024पर्यंत पीकविमा नुकसानभरपाई न दिल्यास नगर जिल्ह्यातील विमाधारक शेतकरी 5 सप्टेंबर 2024 रोजी कृषी आयुक्त कार्यालय , पुणे यांचे कार्यालयाला टाळे ठोकण्याच आंदोलन करणार आहेत असा इशारा स्वतंत्र भारत पक्ष, शेतकरी संघटना, शेतकरी संघटना महिला आघाडीकडून देण्यात येत आहे त्याचसोबत जिल्ह्यातील सर्व आमदार , खासदार,आणि पालकमंत्री यांना नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून जाब विचारला जावा असे आवाहन करण्यात येत आहे