खिर्डी येथील ग्रामसभा खेळीमेळीत संपन्न.
प्रतिनिधी –महेश मासाळ
श्रीरामपूर तालुक्यातील खिर्डी गावातील ग्रामसभा आज दिनांक 30 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी ठीक दहा वाजता खेळी मेळीच्या वातावरणात पार पडली. यावेळी ग्रामसभेचे अध्यक्षस्थानी गावचे सरपंच सौ सुनीता बाबासाहेब कांबळे या होत्या. खिर्डी गावचे ग्रामसेवक श्री गणेश डोंगरे साहेब यांनी गावच्या विकास कामांच्या प्रोसिडिंगचे वाचन केले, तर नंतर गावचे विकास कामासाठी कोणकोणते मुद्दे घ्यायचे अशी चर्चा सुरूवात झाली, पहिला मुद्दा राज्य शासनाच्या लाडकी बहीण योजना व वयोश्री योजनेची माहिती दिली व त्यानंतर या योजनेपासून जे काय कोण नागरिक वंचित आहेत त्यांना या योजनेची माहिती व्यवस्थित समजावून दिली, तसेच गावातील ग्रामपंचायतची घरपट्टी व पाणीपट्टी वसुली करणे याबद्दलची माहिती सादर केली व ती वसुली करण्याच्या सूचना यावेळी ग्रामसेवक भाऊसाहेब यांनी दिल्या, गावातील दरवेशी समाजाला स्मशानभूमीसाठी जागा देण्यासाठी मा. तहसीलदार साहेब यांनी त्यांच्या दफन भूमी व स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध करून देण्यासाठी आलेले परिपत्रक वाचन केले, तसेच अतिक्रमाच्या बाबतीत मा. तहसीलदार साहेब यांनी दिलेल्या नोटिसा संदर्भात ग्रामपंचायतीचा गाववाढीचा प्रस्ताव तयार करून गावातील लोकांना न्याय मिळवून देण्यासंदर्भात यावेळी चर्चा झाली, मोदी आवास योजनेचे ओबीसी समाज तसेच भटक्या जमातीला घरकुल योजने संदर्भातील प्राधान्य परिपत्रक चे वाचन केले, रमाई शबरी आवास योजना अंतर्गत नवीन घरकुल यादीचे प्रस्ताव यादी तयार करणे, धनगर तांडा वस्ती अंतर्गत नवीन निधी उपलब्धता व तेथील कामासंदर्भात निधी मागणीसाठी प्रस्ताव तयार करणे, केंद्र सरकार मार्फत पी.एम.विश्वकर्मा या योजनेची माहिती देऊन तसेच या योजने संदर्भात नियम अटी व या योजनेला लागणारे आवश्यक कागदपत्रे याची माहिती दिली, तसेच गावातील माजी उपसरपंच श्री भाऊसाहेब पारखे यांनी गावातील गवताची झालेली वाढ व त्यातून डासांपासून होणारे रोगराईला आळा बसवण्यासाठी ग्रामपंचायत अंतर्गत फवारणी करण्या संदर्भात विषय मांडला, तसेच राज्य शासनाने सुरू केलेल्या बांधकाम कामगार योजनेच्या संदर्भात गावातील ग्रामपंचायत कडून लाभार्थ्यांना 90 दिवसाची प्रमाणपत्र देण्यासंदर्भात अधिकृत शासन निर्णय होत नाही तोपर्यंत हे प्रमाणपत्र न देण्याचा निर्णय ग्रामसेवक संघटनेच्या वतीने झालेला असून त्याचे सर्व गावकऱ्यांनी नोंद घ्यावी , तसेच गावातील माजी उपसरपंच भाऊसाहेब पारखे यांनी आपल्या गावातील तलाठी कार्यालय सजा खिर्डी या कार्यालयामध्ये स्वतंत्र तलाठी नेमणुकीचे ग्रामपंचायत अंतर्गत पाठपुरावा पत्रक तयार करणे हा विषय घेण्यात आला ,या अशा अनेक विषय यावेळी ग्रामसभेमध्ये घेण्यात आली तर नंतर अहमदनगर जिल्हा पोलीस पाटील संघटनेच्या सदस्य पदी गावातील पोलीस पाटील श्री दिलीप हळनोर यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा ग्रामपंचायत च्या वतीने सत्कार करण्यात आला, त्यानंतर गावातील भूमिपुत्र कु.आशिष गोरक्षनाथ मासाळ यांनी दहावी मध्ये 90 टक्के मार्क मिळवून शाळेमध्ये पहिला आला असल्यामुळे ग्रामपंचायत च्या वतीने त्याचाही सत्कार करण्यात आला, गावातील शेतकऱ्यांना वरदान ठरलेले गावतळी एका वर्षामध्ये दोनदा भरल्याबद्दल गावातील सरपंच उपसरपंच तसेच सर्व सदस्य यांचा सत्कार गावच्या वतीने करण्यात आला, यावेळी शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी गावातील माजी उपसरपंच भाऊसाहेब पारखे यांनी शेतकरी कर्जमाफी संदर्भात जो काही लढा दिला व त्यातून असंख्य शेतकऱ्यांचा फायदा व त्यांना लाभ भेटला त्यामुळे ग्रामपंचायत तर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला, तसेच यामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील अनेक विषयांचे मुद्दे व चर्चा करण्यात आली. या ग्रामसभेसाठी गावचे सरपंच सौ.सुनीता बाबासाहेब कांबळे, उपसरपंच उज्वला रामभाऊ शिंदे ग्रामपंचायत सर्व सदस्य तसेच ग्रामसेवक गणेश डोंगरे साहेब , गावातील सामाजिक कार्यकर्ते व माजी उपसरपंच भाऊसाहेब पारखे व माजी उपसरपंच भास्कर हळनोर, जय श्रीराम फाउंडेशनचे अध्यक्ष तसेच ग्रामपंचायत सदस्य श्री अनिल चितळकर, उपाध्यक्ष नितीन मासाळ, बाबासाहेब कांबळे, भगवान देवकाते,अतुल पवार,विष्णू कदम ,सुभाष पारखे,महेश मासाळ, जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक श्री कोल्हे सर, तसेच गावातील जिल्हा परिषद शाळेतील आदर्श शिक्षक श्री पवार सर व ग्रामपंचायत कर्मचारी कडू मामा बनसोडे व रमेश माळी व सागर कोकरे आदी उपस्थित होते.