भोकर विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमनपदी ससाणे गटाचे बाबासाहेब तागड यांची तर व्हा.चेअरमनपदी मुरकूटे गटाचे सुमन मते बिनविरोध निवड.
भोकर( प्रतिनिधी– चंद्रकांत झुरंगे )
– श्रीरामपूर तालुक्यात राजकीयदृष्ष्या मोठ्या व महत्वाच्यां असलेल्या भोकर विविध कार्यकारीसहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी जिल्हा बँकेचे संचालक करण ससाणे गटाचे बाबासाहेब तागड़ यांची तर व्हा.।चेअरमनपदी अशोक कारखाण्याचे चेअरमन माजी आमदार भानुदास मुरकूटे गटाच्या सौ.. सुमन मते यांची बिनविरोध निवडकरण्यात आली.
येथील चेअरमन व व्हाइस चेअरमन यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेसाठी सहाय्यक निबंधक यांनी जाहीर केलेल्या निवडणुक कार्यक्रमानुसार अध्यासी अधिकारी म्हणून सहाय्यक निबंधक कार्यालयाचे मुख्य लीपीक राजेश जोशी यांनी या निवडी जाहीर केल्या. त्यात चेअरमन पदासाठी माजी नगराध्यक्ष व जिल्हा बॅंकेचे संचालक करण ससाणे गटाचे बाबासाहेब नामदेव तागड यांच्या नावाची सुचना माजी चेअरमन सागर सुरेश शिदे यांनी केली, त्यास निलेश मच्छींद्र विधाटे यांनी अनुमोदन दिले तर व्हा. चेअरमन पदासाठी सुमन पंढरीनाथ मते यांच्या नावाची सुचना माजी चेअरमन किशोर भारत छल्लारे यांनी केली त्यास महेश पुंजाहरी पटारे यांनी अनुमोदन दिले. दोन्ही पदांसाठी एक – एक अर्ज आल्याने या निवडी बिनविरोध झाल्या.
यावेळी मावळते चेअरमन आणणासाहेब काळे, मावळत्या चेअरमन सिताबाई जगदाळे आदिंसह बाळासाहेब विधाटे.महेश पटारे, सागर शिंदे, कारभारी तागड, बाबासाहेब तागड, किशोर छल्लारे, निलेश विधाटे, नारायण पटारे व सुमन मतेआदि संचालक उपस्थीत होते.यावेळी रामदास शिंदे, भागवतराव पटारे, माजी चेअरमन भाऊसाहेब भोईटे, कॉँग्रेस सेवा दलाचे तालुकाध्यक्ष सुदाम पटारे, पंढरीनाथ मते, नानासाहेब जगदाळे, वाल्मीक जाथव, बापूसाहेब खेडकर, लक्ष्मण ढाले, भास्कर फासाटे आदिसह मान्यवर उपस्थीत होते.