अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करा संघटनेचे निवेदन..
प्रतिनिधी — मुनीर सय्यद
दिनांक 21 ऑक्टोंबर रोजी स्वतंत्र भारत पक्ष, शेतकरी संघटना, शेतकरी संघटना महिला आघाडी अहिल्यानगर यांनी प्रांतअधिकारी श्रीरामपूर यांचे मार्फत माननीय जिल्हाधिकारी अहिल्यानगर यांना दिनांक 17 ऑक्टोंबर पासून अहिल्यानगर जिल्ह्यात सुरू असलेल्या अतिवृष्टी मुळे अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे खरीप हंगाममधील काढणीला आलेले सोयाबीन मका कापूस ,लाल कांदा सह विविध पिकांचे नुकसान झाले त्याचे तत्काळ महसूल खात्याकडून व पीकविमा कंपनीकडून पंचनामे करून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तत्काळ मदत देण्यात यावी असे निवेदन दिले
त्याचबरोबर शासनाकडून शेतकऱ्यांना व महिलांना मिळणारे किसान सन्मान योजना, पीकविमा नुकसानभरपाई तसेच लाडकी बहीण योजनेचे मिळणारे अनुदाने सरकारी बँका अवैधरित्या परस्पर कर्ज खात्यात जमा करून शेतकरी व महिलांची लूट करीत आहेत तरी जिल्हाधिकारी यांनी या प्रकरणी जातीने लक्ष घालून सदर शेतकऱ्यांची व महिलांची बँकांकडून होणारी लूट बंद करून सदर बँकांना हे अनुदानाचे पैसे लाभधारक शेतकरी व महिलांना तत्काळ देण्याचे आदेश देऊन त्यांची लूट बंद करावी असे निवेदन जिल्हाधिकारी अहील्ह्यानगर यांना देण्यात आले अन्यथा स्वतंत्र भारत पक्ष, शेतकरी संघटना, शेतकरी संघटना महिला आघाडी अहील्ह्यानागर निवडणूक आचारसंहिता काळात त्रिव आंदोलन करेल याप्रसंगी निर्माण होणारी कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी सर्वस्वी जिल्हाधिकारी अहिल्यानगर यांचेवर राहील असा इशारा सदर निवेदन देऊन आला याप्रसंगी स्वतंत्र भारत पक्षाचे जिल्हाध्यक्ष नीलेश शेडगे, शेतकरी संघटना महिला आघाडीच्या अध्यक्षा सुनीताताई वानखेडे , शीतल पोकळे, वर्षा वानखेडे, आशाबाई महांकाळे,पुष्पा घोगरे ,कोमल वानखेडे, मंदा गमे,प्रकाश जाधव,श्रीराम त्रिवेदी, नवनाथ दिघे,मधू काकड,देविदास वानखेडे,नामदेव घोगरे,सिकंदर शेख ,अकबर शेख ,आदीसह शेतकरी उपस्थित होते