माजी आमदार चंद्रशेखर कदम व नगराध्यक्ष सत्यजीतदादा कदम यांनी मेळावा घेऊन दिला आमदार लहू कानडे यांना पाठिंबा

आमदार लहू कानडे यांच्या संपर्क कार्यालयाचेही झाले उद्घाटन

 

श्रीरामपूर प्रतिनिधी – इमरान शेख 

भाजपाचे ज्येष्ठ नेते व माजी आमदार चंद्रशेखर कदम व त्यांचे पुत्र देवळाली प्रवरा नगर परिषदेचे माजी अध्यक्ष सत्यजित कदम यांनी आज कै. शांताबाई कदम मंगल कार्यालयामध्ये श्रीरामपूर विधनसभा मतदार संघांतील समाविष्ट राहूरी तालुक्यातील व श्रीरामपूर तालुक्यातील त्यांच्या समर्थक भाजपाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. या बैठकीला ५०० ते ६०० कार्यकर्ते उपस्थित होते.

सन २०२४ मधे होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी श्रीरामपूर राहूरी विधानसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेद्वारी बाबतचा संभ्रम दुर करण्यासाठी त्यांनी आज भारतीय जनता पक्षाचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून महायुतीच्या अधिकृत उमेदवारीबाबत माहीती घेतली. राष्ट्रवादी कॅांग्रेस पक्षाचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी व महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीरामपूरचे विद्यमान आमदार लहू कानडे यांना कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊन जाहीर पाठिंबा व्यक्त केला.

याप्रसंगी बोलताना माजी नगराध्यक्ष सत्यजीतदादा कदम म्हणाले, आपला कार्यकर्ता मेळावा सुरू असतानाच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी फोन झाला. त्यांनी महायुतीचे उमेदवार लहू कानडे हेच असून त्यांच्या विजयासाठी काम करा, असे स्पष्ट आदेश दिले आहेत. याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आ. लहू कानडे हेच महायुतीचे अधिकृत उमेदवार असल्याने त्यांचेच काम करण्याचे आदेश दिल्याने आपण सर्वांनी महायुतीचे उमेदवार आ. लहू कानडे यांच्या विजयासाठी तन-मन-धनाने काम करावे, असे आवाहन केले.

यावेळी विक्रम तांबे, सुरेश थेऊरकर, अमृत धुमाळ, अमोल धुमाळ, काशिनाथ जाधव, भास्कर खाडे, दत्तात्रय आढाव, नाना निमसे, सोसायटी चेअरमन शहाजी कदम, भाजप फॅक्टरी शहराध्यक्ष वसंत कदम, गणेश पवार, पोपट खाडे, राधुभाऊ करपे, रामभाऊ पवार, दिलावर पठाण, बाळासाहेब मुसमाडे आदींनी मनोगत केले.

यावेळी माजी नगराध्यक्ष मुरलीधर कदम, सोपान भांड, भाजप शहराध्यक्ष अजित चव्हाण, अमोल कदम, भारत शेटे, सचिन सरोदे, शहाजी पाटील कदम, अभिजित कदम, जगन्नाथ येवले, जिजाबा चिंधे, शशी खाडे, रामेश्वर तोडमल, बाळासाहेब लोखंडे, सतीश वने, सचिन शेटे, सचिन निमसे, राजू चव्हाण आदिंसह कार्यकर्ते उपस्थित होते. प्रास्तविक माजी उपनगराध्यक्ष प्रकाश संसारे यांनी केले. सूत्रसंचालन चेतन कदम यांनी केले.

 

मेळाव्यनंतर देवळालीप्रवरा येथे सुरू करण्यात आलेल्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन माजी नगराध्यक्ष सत्यजीतदादा कदम यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आमदार लहू कानडे, राष्ट्रवादी कॅांग्रेस पक्षाचे राष्ट्रीय सचिव व प्रवक्ते अविनाश आदीक, राष्ट्रवादी कॅांग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष बाळासाहेब ढूस, अंकुश कानडे, अमृतकाका धुमाळ, , राष्ट्रवादी काँग्रेसचे श्रीरामपूर तालुकाध्यक्ष कैलास बोर्डे, सरपंच किशोर बकाल, नानासाहेब रेवाळे, आदिवासी भिल्ल संघटनेचे अध्यक्ष शिवाजी गांगुर्डे, अजय खिलारी, बाळासाहेब लोखंडे, अनिल बिडे, दीपक पवार, केदारनाथ चव्हाण, सचिन निमसे, राहुल महांकाळ, विलास संसारे, नारायण रिंगे आदिंसह कार्यकर्ते उपस्थित होते.

……………

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!