ठराविक घराण्याचे हित बघण्यासाठी आपली उमेदवारी कापली – आ. कानडे
श्रीरामपूर प्रतीनीधी –
गरीब समाजामधील नेतृत्व पुढे येऊ द्यायची नाही, केवळ ठराविक घराण्याची हित बघायचे असल्याने माझी उमेदवारी कापली. काँग्रेसला फक्त दलित, आदिवासी मागासवर्गीय केवळ मते हवे आहेत. मात्र त्या समाजातून पुढे आलेले नेतृत्व रुजू द्यायचं नाही, वास्तविक विद्यमान आमदाराचे (सीटिंग MLA) तिकीट कधीच कापले जात नाही. उलट त्यामुळे त्या त्या पक्षाला तेथील जागा सुटते. श्रीरामपूरमध्ये काँग्रेसचा आमदार असल्यामुळे काँग्रेसला उमेदवारी मिळाली. परंतु एकच घराण्यांचे लाड पुरवण्यासाठी माझी उमेदवारी नाकारून काँग्रेसचे नेत्यांनी श्रीगोंदामध्ये विधानसभेला काँग्रेसच्या चिन्हावर अनामत रक्कम (डिपॉझिट) वाचवू न शकलेला बाहेरचा उमेदवार लादला. हा केवळ माझ्यावर नव्हे तर श्रीरामपूर-राहुरी मतदारसंघामधील मायबाप जनतेवर केलेला अन्याय आहे. त्यामुळे अशा संकट काळात महायुतीचा उमेदवार म्हणून आपण मला आशीर्वाद देऊन पुन्हा सेवा करण्याची संधी द्यावी, असे आवाहन आमदार लहू कानडे यांनी चिंचोली येथील प्रचार सभेत बोलताना केले.
आ. कानडे यांच्या प्रचारार्थ मतदार संघातील राहुरी तालुक्यातील रामपूर, चिंचोली, पिंपळगाव फुणगी, गंगापूर, संक्रापूर व दवणगाव येथे झालेल्या प्रचार सभेत ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव व प्रवक्ते अविनाश आदिक, राहुरी बाजार समितीचे माजी सभापती विनोद कोतकर, महिपती देवस्थानचे अध्यक्ष राजेंद्र साबळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष कैलास बोर्डे, सरपंच किशोर बकाल, नानासाहेब रेवाळे, आदिवासी भिल्ल संघटनेचे अध्यक्ष शिवाजी गांगुर्डे, दीपक पवार आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना आ. कानडे म्हणाले, काँग्रेसच्या स्थानिक मंडळी भारुडे रचून पक्षाची दिशाभूल करून तिकीट कापले परंतु परमेश्वर चांगल्या माणसाच्या पाठीशी असतो आणि कधीही कोणाबद्दल वाईट बोललेलो नाही पक्षाशी एकनिष्ठ होतो हा चांगुलपणा आपल्या कामाला आला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील चौकशी केली एकीकडे कसे चित्रपट केले या आनंदात फटाके फुटत होते तर दुसरीकडे अनेक पक्षांनी फोन करून तुम्ही सर्व सर्वेमध्ये अग्रेसर आहात पक्षात या असे म्हणत असताना मी शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारांच्या तसेच माझ्या विचारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सहभागी झालो अडचणीच्या काळात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घटक पक्षातील नेत्यांशी चर्चा करून आपल्याला उमेदवारी दिली, ही आपल्या प्रामाणिकपणाची पावती असून मायबाप मतदारांनी पुन्हा आपल्याला संधी द्यावी असे आवाहन त्यांनी केले.
अविनाश आदिक म्हणाले, सन 99 पासूनचा इतिहास बघितल्यास इतर आमदार विधानसभेत शांत बसायचे, परंतु आ. कानडे यांची प्रश्नांना वाचा फोडणारे आमदार म्हणून ओळख आहे. मतदार संघातील शेतकरी. शेतमजूर. महिला यांचे प्रश्न त्यांनी पोटतिडकीने मांडून सरकारला त्यावर उत्तर देण्यास भाग पाडले. मतदार.संघात 1200 कोटी रुपयांची विकास कामे केली. विज, पाणी, शेती, शिक्षण, उद्योग, महिला अशा विविध क्षेत्रात त्यांनी विकास कामे केली आहेत. त्यामुळे मतदारसंघात `कामदार आमदार` म्हणून ओळख निर्माण झाली आहे. अशा काम करणाऱ्या आ. कानडे यांना मोठ्या मताधिक्क्याने विजयी करावे, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी सरपंच दादासाहेब मेहत्रे, नारायण टेकाळे, कारभारी विटनोर, नितीन खळदकर, तुषार तनपुरे, मनोज सरोदे, अमोल पठारे, चांगदेव नालकर, दीपक पवार, माजी चेअरमन ज्ञानदेव लोखंडे, माजी सरपंच भाऊसाहेब साबळे, गवजी लोखंडे, नबाजी जगताप, रामदास पांढरे, रमा गांगरे, विक्रम जगताप, सागर चेढे, अंबीर शेख, द्वारकनाथ चव्हाण, लक्ष्मण चव्हाण, पंढरीनाथ जगताप, भरत सालबंदे, ज्येष्ठ कलावंत शांताबाई जाधव, दावल शेख, सरपंच शिवा जाधव, माजी सरपंच दत्तात्रय पारखे, शंकर नान्नोर, दत्तात्रय जाधव, परसराम गर्दे, गोपीनाथ वर्पे, बाळासाहेब डमाळे, श्याम जाधव, सचिन बनसोडे, किरण माळी, रमजान शेख, पोपट वडीतके, अशोक नानोर, सुभाष परभणी, विकास जाधव, दिलीप डमाळे, पंडित वडीतके, गणेश वडीतके यांच्यासह कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.
………