ब्रेकिंग न्यूज….
श्रीरामपूर शहरातील बंडखोर उमेदवार भाऊसाहेब कांबळे यांच्यासाठी होणारी मा.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा रद्द झाली असून त्यांचा महायूतीचे उमेदवार लहू कानडे यांना पाठींबा….?
श्रीरामपूर प्रतीनीधी —
महायुतीची उमेदवारी आमदार लहू कानडे यांना जाहीर झाली होती.यथापी भाऊसाहेब कांबळे यांनी देखील शिवसेनेकडून उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांना अर्ज माघार घेण्यासाठी ना. विखे पाटील यांच्या माध्यामातून सुचना करण्यात आल्या होत्या.तरी देखील त्यांनी उमेदवारी अर्ज माघार घेतली नाही.आणि उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी ते गायब झाले. फोन बंद करून ठेवला त्यामुळे त्यांची उमेदवारी राहीली.
विश्वसनीय सूत्रांकडून समजलेली माहिती की, उद्या होणारी मा.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची होणारी सभेचे आयोजन केले होते.पण वरीष्ठ पातळीवरून घडामोडींना वेग आला असून मा.मूख्यमंत्री यांनी भाऊसाहेब कांबळे यांच्या सभेसाठी न येण्याचा निर्णय घेतला असून त्यांना आमदार लहू कानडे यांना पाठींबा देण्याचे विश्वसनीय सूत्रांकडून कळविले आहे.
त्यामुळे येत्या एक दोन दिवसात त्यांचा पाठिंबा महायुतीचे अधिकृत उमेदवार लहू कानडे यांना जाहीर होईल.यामध्ये कोणतीही शंका नाही. कालच महायूतीचे उमेदवाराचा प्रचारांचा शुभारंभ विखे साहेबाच्या व प्रदेशाध्याक्ष तटकरे साहेबाच्या उपस्थितीत पार पडला. ना. विखे साहेब यांनी भाऊसाहेब कांबळे यांनी विश्वासाधात केल्याचे जाहीररित्या सांगितले. तसेच भाऊसाहेब कांबळे यांना त्यांच्या फॅलॅक्स वरील साहेबाचे फोटो काढण्यावरून सुनवले आहे.तसेच आमदार लहू कानडे यांना निवडून आण्याव्यासाठी कटिबद्ध असलेल्या महादेवाच्या साक्षीने शपथ घेतली त्या दिवसापासून आजतागायत विखे साहेबांच्या माध्यामातून मोठ्या घडामोडी घडत आहे आज श्रीरामपूर तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी मुंबई ला गेले होते . मुंबई मध्ये घडामोडी वेगाने घडत असून दोनतीन दिवसात सारे चित्र स्पष्ट होईल असे विश्वसनीय सूत्रांकडून कळते .