ब्रेकिंग न्यूज….
श्रीरामपूर शहरातील बंडखोर उमेदवार भाऊसाहेब कांबळे यांच्यासाठी होणारी मा.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा रद्द झाली असून त्यांचा महायूतीचे उमेदवार लहू कानडे यांना पाठींबा….?

श्रीरामपूर प्रतीनीधी —

महायुतीची उमेदवारी आमदार लहू कानडे यांना जाहीर झाली होती.यथापी भाऊसाहेब कांबळे यांनी देखील शिवसेनेकडून उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांना अर्ज माघार घेण्यासाठी ना. विखे पाटील यांच्या माध्यामातून सुचना करण्यात आल्या होत्या.तरी देखील त्यांनी उमेदवारी अर्ज माघार घेतली नाही.आणि उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी ते गायब झाले. फोन बंद करून ठेवला त्यामुळे त्यांची उमेदवारी राहीली.
विश्वसनीय सूत्रांकडून समजलेली माहिती की, उद्या होणारी मा.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची होणारी सभेचे आयोजन केले होते.पण वरीष्ठ पातळीवरून घडामोडींना वेग आला असून या.मूख्यमंत्री यांनी भाऊसाहेब कांबळे यांच्या सभेसाठी न येण्याचा निर्णय घेतला असून त्यांना आमदार लहू कानडे यांना पाठींबा देण्याचे विश्वसनीय सूत्रांकडून कळविले आहे.
त्यामुळे येत्या एक दोन दिवसात त्यांचा पाठिंबा महायुतीचे अधिकृत उमेदवार लहू कानडे यांना जाहीर होईल.यामध्ये कोणतीही शंका नाही.अशी चर्चा नागरिकांमध्ये चालू आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!