पश्चिमेकडील पाणी पूर्वेकडे वळवून गोदावरी खोऱ्यातील तूट भरून काढणार- खा. तटकरे
आ. कानडे हेच महायुतीचे उमेदवार- राधाकृष्ण विखे पा.
आमदार लहू कानडे यांचा प्रचार नारळ शुभारंभ
श्रीरामपूर प्रतीनीधी – इमरान शेख
पश्चिमेकडील पाणी पूर्वेकडे वळवून गोदावरी खोऱ्यातील तूट भरून काढणार असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरे यांनी केले. तर आमदार लहू कानडे हेच महायुतीचे उमेदवार असल्याचे सांगत पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आ. कानडे यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केले.
भैरवनाथनगर येथील महादेव मंदिरात आयोजित केलेल्या श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस व महायुतीचे उमेदवार आमदार लहू कानडे यांचा प्रचार नारळ शुभारंभ पालकमंत्री विखे पाटील यांच्या हस्ते व खा. तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली झाला. त्यावेळी झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी आमदार लहू कानडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव व प्रवक्ते अविनाश आदिक, माजी नगराध्यक्ष अनुराधा आदिक, प्रदेश सरचिटणीस अरुण पाटील नाईक, भाजपाचे तालुकाध्यक्ष दीपक पटारे, इंद्रनाथ थोरात, माजी सभापती नानासाहेब पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कपिल पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष कैलास बोर्डे, अमृत धुमाळ, जिल्हा परिषदेचे सदस्य शरद नवले, नितीन दिनकर आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
खा. तटकरे म्हणाले, शेतीचा सहकाराचा जिल्हा म्हणून अहील्यानगरची ओळख आहे. जिल्ह्याच्या पाणी प्रश्नासाठी पालकमंत्री विखे पाटील यांच्या मागणीनुसार पश्चिमेकडील पाणी पूर्वेकडे वळवले जाईल. कारण २०० ते ३०० टीमसी समुद्राला वाया जाते ते वळविण्याचा निर्णय महायुती सरकारने घेतला आहे. राज्यातील महायुती सरकारने कांदा निर्यात बंदी उठवली, साखरेचे धोरण घेतले, वीज माफी केली, लाडकी बहिण योजना केली, उपमुख्यमंत्री अजित पवारांनी राज्याला आर्थिक शिस्त लावल्याचे सांगत ते म्हणाले, स्वर्गीय गोविंदराव आदिक यांनी मतदारसंघात मोठी विकास कामे केली. त्यांच्या रूपाने सुसंस्कृत नेतृत्व तालुक्याने अनुभवले. श्रीरामपूर ते जनता सुसंस्कृत आहे. आ. कानडे यांच्या रूपाने तालुक्याला समंजसपणाचे नेतृत्व त्यांनी दिले आहे. विखे पाटील यांनी मनावर घेतले तर कानडे साहेब तुम्ही आमदार झाला. त्यांनी मनावर घेतले म्हणून मी येथे आलो. त्यामुळे तुम्ही मोठ्या मताधिक्क्याने विधानसभेत जाणार असल्याचे खा. तटकरे म्हणाले.
पालकमंत्री विखे पाटील म्हणाले, आ. कानडे यांची जबाबदारी आपली आहे. त्यांना प्रशासकीय कामाचा अनुभव आहे. त्याचा उपयोग त्यांनी निष्ठेने विकास कामांसाठी केला. परंतु त्यांची एक चूक झाली, प्रशासकीय कामाचा अनुभव असला तरी राजकीय अनुभव नव्हता, भलत्याच लोकांच्या नादी लागल्याने तुमचा घात झाला. परंतु त्यानिमित्ताने एक चांगला आमदार महायुतीला मिळाला. आ. कानडे हेच महायुतीचे उमेदवार असून श्रीरामपूर तालुक्यातील जनता काँग्रेसचे भूत गाडल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असे ते म्हणाले.
आ. कानडे म्हणाले, आपले तिकीट कापले जाईल, तुम्हाला हिरवळीतील साप या पद्धतीने चावतील, असे स्वप्नातही वाटले नव्हते. एवढा विश्वास घातकी अनुभव कोणाच्या वाट्याला येऊ नये, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार पालकमंत्री विखे खासदार तटकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आपल्याला उमेदवारी दिली. कपटनीतीच्या माणसापासून दूर झालो, झाले ते बरच झालं, असे ते म्हणाले. आपण मतदार संघात १२०० कोटींचा निधी आणत विकास कामे केली. माहिती सरकारने शेतकरी कष्टकरी महिला यांच्यासाठी महत्त्वकांक्षी योजना राबविल्या. पालकमंत्री विखे पाटील यांनी श्रीरामपूर तालुक्यासाठी भेदभाव न करता मोठा निधी दिला. गावठाणसाठी जमिनी दिल्या. श्रीरामपूर शहरासाठी 25 एकर जमीन विनामूल्य दिली.
आ. कानडे यांनी सन्मानपूर्वक वागणूक दिल्याचे तसेच कोट्यावधी रुपयांची विकास कामे केल्याचे मतदारसंघातील मतदार सांगत आहेत. त्यामुळे तालुक्यात महायुतीसाठी पोषक वातावरण आहे. आ. कानडे यांचे तिकीट कापल्याने आम्हाला चांगला उमेदवार मिळाला असून तेच महायुतीचे अधिकृत उमेदवार असल्याचे अविनाश आदिक यावेळी म्हणाले. यावेळी कैलास बोर्डे, माजी नगरसेवक राजेंद्र पवार, निलेश भालेराव यांची भाषणे झाली. भाजपाचे तालुकाध्यक्ष दिपक पटारे यांनी आभार मानले.
यावेळी अशोक कारखान्याचे माजी संचालक प्रा. कार्लस साठे, पोपटराव जाधव, बाळासाहेब मुंगसे, उद्योजक अंकुश कानडे, उपसभापती अभिषेक खंडागळे, जि. प. चे माजी अध्यक्ष मिस्टर शेलार, नानासाहेब शिंदे, शिवाजी गांगुर्डे, माजी नगरसेवक रवींद्र गुलाटी, राजेश अलग, मोहम्मद शेख, सलीम शेख, मुख्तार शहा, प्रकाश ढोकणे, विजय शेळके, मल्लू शिंदे, अल्तमश पटेल, जितेंद्र छाजेड, अशोक कानडे, गौतम उपाध्ये, केतन खोरे, शामराव निमसे, विनोद कोतकर, राधाकृष्ण आहेर, सतीश बोर्डे, सचिन जगताप, विष्णुपंत खंडागळे, राजेंद्र कोकणे, सुरेश पवार, दीपक निंबाळकर, दीपक कदम, विजय शेलार, सरपंच अशोक भोसले, सरपंच सागर मुठे, अमोल कदम, हरिभाऊ बनसोडे, बाबासाहेब कोळसे, सुरेश पवार, आबा पवार, नानासाहेब रेवाळे, विष्णुपंत बडाख, रमेश उंडे, रवींद्र मुरकुटे, विजय दवंगे, पी. एस. निकम, रवी गायकवाड, सचिन ब्राह्मणे, सुभाष त्रिभुवन, भीमा बागुल, अजय खिलारी, अनिल बिडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य प्रतिनिधी विश्वनाथ आवटी, सुनील थोरात, विधानसभा अध्यक्ष किशोर पाटील बकाल, अल्पसंख्यांक सेल जिल्हाध्यक्ष साजिद मिर्झा, शहराध्यक्ष अभिजीत लिप्टे, श्रीकांत दळे, भागचंद औताडे, सुधाकर बोंबले, शहर उपाध्यक्ष सैफ शेख, माजी नगरसेवक नजीर मुलानी, तालुका युवक उपाध्यक्ष ॲड. संदीप चोरगे, युवक शहर उपाध्यक्ष तौफिक शेख, सागर कुऱ्हाडे, माजी नगरसेविका अर्चना पानसरे, वनिता खोसरे, सुप्रिया धुमाळ, मंगल व्यवहारे, महिला तालुकाध्यक्ष मंदाताई गवारे, युवती जिल्हाध्यक्ष प्रियंका जनवेजा, रुबीना पठाण यांच्यासह श्रीरामपूर शहर तालुका व राहुरी तालुक्यातील 32 गावातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
,………
माजी आमदार भाऊसाहेब कांबळे यांना उद्देशून, तुम्ही माघारीच्या दिवशी नॉट रिचेबल होता. आता रिचेबल आहात. तुम्हाला जाहीर संगतो की, महायुतीचे उमेदवार लहू कानडे हेच आहेत. तुम्हाला आमचा पाठिंबा नाही, तुम्ही विश्वासघात केला, त्यामुळे क्षमा नाही, असे पालकमंत्री विखे पाटील यांनी यावेळी ठणकावून सांगितले.
………….