भोकर येथे क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले जयंती साजरी.

( प्रतिनिधी -चंद्रकांत झुरंगे,भोकर)

श्रीरामपूर तालुक्यातील भोकर ग्रामपंचायत कार्यालय व सोसायटी कार्यालय येथे क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांचे प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून 192 वी जयंती साजरी करण्यात आली.
येथील ग्रामपंचायत कार्यालय येथे लोकनियुक्त सरपंच सौ. शितलताई पटारे व उपसरपंच सागर आहेर यांचे हस्ते तर विविध कार्यकारी सोसायटी कार्यालय येथे सोसायटीचे नवनिर्वाचीत चेअरमन आण्णासाहेब काळे व नानासाहेब जगदाळे यांचे हस्ते पुष्पहार अर्पण करून स्त्री शिक्षणाची ज्योती क्रांती ज्योती सावित्रीमाई फुले यांना विनम्र अभिवादन करून जयंती साजरी करण्यात आली.
यावेळी ग्रामपंचायत कार्यालयात प्रताप पटारे, सागर शिंदे, सम्राट माळवदे, पत्रकार चंद्रकांत झुरंगे, सुरेश अमोलीक, राहुल अभंग, मयूर काळे, गीरीष मते, संदिप गांधले, काळू गायकवाड, रावसाहेब लोखंडे, रमेश भालके, शंकर बेरड, पप्पू थोरात, सुनिल साळवे, सोमनाथ पंडीत आदिंसह मान्यवर उपस्थीत होते तर सोसायटी कार्यालय येथे गणेश छल्लारे, महेश पटारे, कारभारी तागड, बाळासाहेब विधाटे, भाऊराव सुडके, पप्पू थोरात, नारायण पटारे, बाबुराव तागड, नवनाथ मते, गोरक्षनाथ आबुज आदिंसह मान्यवर उपस्थीत होते.

भोकर ग्रामपंचायत कार्यालय येथे क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांना पुष्पहार अर्पण करताना सरपंच सौ.शितलताई पटारे, उपसरपंच सागर आहेर, सागर शिंदे, सम्राट माळवदे, पत्रकार चंद्रकांत झुरंगे, सुरेश अमोलीक, राहुल अभंग, मयूर काळे, गीरीष मते, संदिप गांधले, काळू गायकवाड, रावसाहेब लोखंडे, रमेश भालके, शंकर बेरड, पप्पू थोरात, सुनिल साळवे, सोमनाथ पंडीत आदि दिसत आहेत.(छाया-पप्पू थोरात)
भोकर सोसायटी कार्यालय येथे क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांना पुष्पहार अर्पण करताना चेअरमन आण्णासाहेब काळे समवेत नानासाहेब जगदाळे, गणेश छल्लारे, महेश पटारे, कारभारी तागड, बाळासाहेब विधाटे, भाऊराव सुडके, पप्पू थोरात, नारायण पटारे, बाबुराव तागड, नवनाथ मते, गोरक्षनाथ आबुज आदि दिसत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!