1. श्रीरामपुर व राहुरी तालुक्यातील घातक शस्त्रासह दरोडा, जबरी चोरी, चोरी, घरफोडी चोरी, खुनाचाप्रयत्न, गंभीर दुखापत करणे, अशा प्रकारचे गंभीर स्वरुपाचे गुन्हे करणाऱ्या १० इसमांना एक वर्षोंकरीता केले हद्यपार..
  2. श्रीरामपूर प्रतिनिधी —

प्रस्तृत बातमीतील हकीगत अशी की, श्रीरामपुर शहर व तालुक्यातील (१) राहुल विलास शेंडगे, रा. वेथेलचर्च जवळ, दत्तनगर, श्रीरामपुर (२) दिपक बबन जाथव, रा. वार्ड नं.६, श्रीरामपुर (३) विशाल उर्फ अंडया सुरेशसोळसे, रा. सम्राट जिम जवळ गाधवरणी,वार्ड नं. १, श्रीरामपुर (४) शहाबाज सलीम शेख, रा. काझीबाबा रोड, वार्डनं.२, श्रीरामपुर (५) साजीद उर्फ मुनचुन खालीद मलीक, रा. पापा जलाल रोड, वार्ड नं.२, श्रीरामपुर (६) अरवाजएजाज बागवान, रा. आहिल्यादेवीनगर, वार्ड नं.२, श्रीरामपुर,ता. श्रीरामपुर,जि. अहमदनगर

तसेच राहुरी तालुक्यातील (१) गोरख अशोक बर्ड, रा. राहुरी खुर्द. ता. राहरी, (२) राकेश उर्फ जॉकी संजयमाळी, रा. एकलव्य नगर, राहुरी,ता.राहुरी, (३) विनायक गणपत बर्डे, रा. बारागाव नांदुर,ता. राहुरी, (४) ररविंद्र उर्फभोदया सुर्यभान माळी, रा. बारागाव नांदुर, ता. राहुरी, जि. अहमदनगर यांचे विरुध्दचे प्रस्तावांची चौकशी उपविभागीय पोलीस अधीकारी, श्रीरामपुर विभाग, श्रीरामपुर यांनी करुन हद्यपर त्यांना हद्पार करण्यासंदर्भातशिफारशीच्या अहवालावरुन श्री.किरण पाटील, उप विभागीय दंडाधिकारी, श्रीरामपुर विभाग,जि. अहमदनगरयांनी वरील १० इसमांना एक वर्षाकरीता अहमदनगर जिल्हयातील श्रीरामपुर, राहुरी,राहाता, कोपरगाव, संगमनेर वनेवासा तालुक्यातुन हद्यपार केले बाबतचे पारीत केले आहेत.

वरील इसमांवर दरोडा, आर्म अॅक्ट, जबरी चोरी, चोरी, घरफोडी चोरी, खुनाचा प्रयत्न, गंभीर दुखापत करणे,अशा प्रकारचे गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल असल्याने त्यांच्यावर हद्यरपारीची कारवाई करण्यात आलेली असुन येणान्याकाळात अहमदनगर जिल्हयात अशा प्रकारचे गुन्हे करणा-या इसमांवर कारयदयाचा वचक रहाण्यासाठी जिल्हयातीलशरीराविरुध्द व मालाविरुध्द तसेच भारतीय हत्यार कायदयान्वये गुन्हें करणान्या गुन्हेगार इसमांची माहिती संकलीत करुनत्यांचे विरुध्द हद्यपारीची कार्यवाही करण्यात येणार असून वरील इसमां व्यतिरीक्त सुमारे २०० इसमांविरुध्द हद्यपारीचीकारवाई करण्यात येणार असल्याचे संकेत मा. श्री.सिथ्दाराम सालिमठ, जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी,अहमदनगर व मा.श्री. राकेश ओला, पोलीस अधीक्षक, तथा हद्दपार प्राधिकरण अहमदनगर यांनी दिलेले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!