त्रिदल सैनिक सेवा संघाचे विविध मागण्यांचे जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयास निवेदन.
श्रीरामपूर [ प्रतिनिधी –राजेंद्र देसाई ]
सविस्तर वृत्त असे की गेली 6/7 वर्षे व देशात दुर्धर आजार कोवीड 19 नंतर सैनिक मेळावा न घेण्यात आल्याने श्रीरामपूर तालुक्यातील माजी सैनिकांना राज्य ,केंद्र तसेच सैनिक कार्यालयाच्या माध्यमातून शासनाच्या कल्याणकारी योजनांच्या लाभापासून वंचित रहावे लागत आहे हे काम जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाचे आहे श्रीरामपूर तालुका हा जिल्ह्यातील सर्व तालुक्यांत मोठा व तिन्ही दलाचे मोठ्या संख्येने माजी सैनिक असलेल्या तालुक्यातील एक आहे ,तालुक्यामध्ये अनेक बुजुर्ग सैनिक, विधवा पत्नी,वीर पत्नी, वीर माता ,अपंग सैनिक असे अनेक सैनिक आहेत जे सैनिक कल्याण कार्यालय अहमदनगर येथे जाऊं शकत नाहीत त्यामुळे सैनिकांना मिळणाऱ्या सुविधा व माहिती प्राप्त होत नाही उदा, विधवांना प्रतिवर्ष मिळणारी आर्थिक मदत, वैद्यकीय मदत व मदतीची माहिती, पाल्यांना मिळणारी शैक्षणिक व आर्थिक मदत,शालेय शिष्यवृत्ती, पाल्य भरती प्रक्रिया, अपंग सैनिकांना मिळणाऱ्या सुविधा, मुलींच्या विवाहासाठी मिळणारा राज्य सरकार आणि केंद्र सरकारचा निधी,सीएसडी कॅन्टीन सुविधा अशा अनेक प्रकारच्या समस्यांचे निवेदन त्रिदल सैनिक सेवा संघाच्या वतीने सहाय्यक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी अहमदनगर मा, चित्रसेन गडांकुश यांना देण्यात आले आहे म्हंटले आहे की लवकरात लवकर मेळाव्याचे आयोजन करावे जेणेकरून माजी सैनिकांना मिळत असलेल्या सुविधांपासुन वंचित रहावे लागणार नाही या निवेदनावर त्रिदल सैनिक सेवा संघाचे नगर उत्तर विभागाचे उपाध्यक्ष मेजर कृष्णा सरदार ,तालुका अध्यक्ष संग्राम जीत यादव ,बाळासाहेब बनकर ,भगीरथ पवार ,सुनील गवळी ,मंगेश यादव, अमित देशमुख ,संतोष देवराय बाळासाहेब भागडे ,रवींद्र कुलकर्णी ,विलास खर्डे, सोमनाथ ताके, असलम शेख ,रामदास वाणी ,अशोक कायगुडे, कैलास खंडागळे ,अनिल काळे, सुधाकर हरदास ,चांगदेव धाकतोडे, राजेंद्र कांदे इत्यादींची स्वाक्षरी आहे