राजेंद्र एकनाथ भाकरे यांची वडाळामहादेव सोसायटीच्या संचालकपदी बिनविरोध निवड

श्रीरामपूर / प्रतिनिधी: अफजल मेमन

तालुक्यातील राजकीयदृष्या महत्वाची असलेली माजी आ.भानुदास मुरकुटे व जिल्हा बँकेचे संचालक करण ससाणे यांचे अधिपत्याखालील वडाळामहादेव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या संचालकपदी भटक्या जाती विमुक्त जमाती मागास प्रवर्ग या रिक्त झालेल्या जागेवर राजेंद्र एकनाथ भाकरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
श्रीरामपूर तालुका सहाय्यक निबंधक संदीपकुमार रुद्राक्षे यांच्या अध्यक्षतेखाली वडाळा महादेव सोसायटीच्या सभागृहात ही निवड करण्यात आली. सदर निवडीस धनंजय पवार यांनी सूचना मांडली तर त्यास बाबासाहेब अभंग यांनी अनुमोदन दिले.
यावेळी अशोक कारखान्याचे संचालक रामभाऊ कसार, संस्थेचे चेअरमन दिलीपराव पवार, व्हा. चेअरमन बाबासाहेब अभंग, संचालक धनंजय पवार, बाळासाहेब कसार, मनोज गवळी, सुशिलाबाई उघडे, मंगल पवार, अनिता कसार, रोहिदास कसार, सचिव जनार्दन नाईक आदींसह सभासद व हितचिंतक उपस्थित होते.
पत्रकार अफजल मेमन, श्रीरामपूर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!