श्रीरामपूर तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांची नाव अनुदान यादीत समाविष्ट करण्यात यावेत व त्या शेतकऱ्यांना कापूस , सोयाबीन पिकांचे हेक्टरी पाच हजार रुपये अनुदान देण्यात यावे असे निवेदन स्वतंत्र भारत पक्ष, शेतकरी संघटना, शेतकरी संघटना महिला आघाडीने श्रीरामपूरचे माननीय तहसीलदार श्री मिलिंदकुमार वाघ , आणि तालुका कृषी अधिकारी श्री आशिष चंदन यांना देण्यात आले.
श्रीरामपूर प्रतिनिधी — मुनीर सय्यद
श्रीरामपुर तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांची मागील वर्षीचे ई पीकपाहणी काही तांत्रिक कारणामुळे केली न गेल्यामुळे सोयाबीन,कापूस,अनुदान यादीत नाव न आल्यामुळे हे शेतकरी हेक्टरी पाच हजार रुपये अनुदान पासून वंचित राहणार आहेत,अनुदान यादीत नाव न आलेल्या श्रीरामपूर तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांची नाव अनुदान यादीत समाविष्ट करण्यात यावेत व त्या शेतकऱ्यांना पणं कापूस , सोयाबीन पिकांचे हेक्टरी पाच हजार रुपये अनुदान देण्यात यावे असे निवेदन स्वतंत्र भारत पक्ष, शेतकरी संघटना, शेतकरी संघटना महिला आघाडीने श्रीरामपूरचे माननीय तहसीलदार श्री मिलिंदकुमार वाघ , आणि तालुका कृषी अधिकारी श्री आशिष चंदन यांना देण्यात आले.
सदर निवेदनात अनेक शेतकऱ्यांकडे स्मार्ट मोबाईल फोन नसल्यामुळे , शेतकरी अशिक्षित ,अडाणी असल्यामुळे तसेच वावरात मोबाईल फोनला रेंज नसल्यामुळे अनेक शेतकऱ्यांना ई पीक पाहणी करता आली नाही त्यामुळे अनुदान यादीत नाव आली नाहीत त्या शेतकऱ्यांची नाव अनुदान यादीत समाविष्ट करण्यात यावेत व अनुदानपासून वंचित राहिलेल्या सर्व शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार रुपये अनुदान देण्यात यावे असे निवेदन तहसीलदार आणि तालुका कृषी अधिकारी श्रीरामपूर यांना देण्यात आले .
याप्रसंगी स्वतंत्र भारत पक्षाचे जिल्हाध्यक्ष नीलेश शेडगे, शेतकरी संघटना महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा सुनीताताई वानखेडे पा.
प्रकाश जाधव, बाळासाहेब घोगरे, श्रीराम त्रिवेदी,सुभाष घोगरे,सिकंदर शेख,लतिफ शेख,सलीम शेख ,मधू काकड,भानुदास चोरमल,रुख्मिणी वानखेडे,बेबी शेख,अलका सिनारे ,शोभा खताळ,शीतल पोकळे,सुनीता आढाव,अर्चना घोगरे,संजय बडाख ,सुदामराव आसने,योगेश महांकाळे,नामदेव घोगरे आदीसह तालुक्यातील शेतकरी उपस्थित होते