श्रीरामपूर तालुक्यातील खिर्डी येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा .
श्रीरामपूर प्रतिनिधी — महेश मासाळ
श्रीरामपूर तालुक्यातील खिर्डी येथे ग्रामपंचायत कार्यालय व जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
ग्रामपंचायत कार्यालय येथे ग्रामपंचायत सदस्य अंजना बाळासाहेब येळे यांच्या हस्ते ध्वज पूजन करून ध्वजारोहण करण्यात आले.तर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सरपंच सौ.सुनिता बाबासाहेब कांबळे यांच्या हस्ते ध्वज पूजन व ध्वजारोहण पार पडले. यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर करत उपस्थितांची मने जिंकली. तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान चिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते गुणगौरव करण्यात आला.
तर उपस्थित विद्यार्थ्यांना मन्सूर बागवान,मच्छिंद्र थोरात,गंगाराम पारखे,हबीब पठाण,सुरेश माकोने यांच्यावतीने विद्यार्थ्यांना भोजन देण्यात आले.
यावेळी गावातील कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक दशरथ पिसे,उपसरपंच उज्वला शिंदे, ग्रामसेवक गणेश डोंगरे, शालेय शिक्षण कमिटीचे अध्यक्ष संदीप रेवाळे, श्रीरामपूर तालुका भाजपा सरचिटणीस अनिल चितळकर,सोसायटीचे चेअरमन शनेश्वर पवार,अशोक पारखे,माजी सरपंच भास्कर हळनोर,तंटामुक्ती अध्यक्ष भरत जाधव,हरिभाऊ रेवाळे, सचिव संजय बनसोडे,भगवान ग्रामपंचायत सदस्य आप्पासाहेब माकाने पवार,कंकर बागवान,बाळासाहेब पारखे,कैलास पवार,पांडुरंग पवार,किरण देवकाते,शुभम बनसोडे,कडू बनसोडे,बाबासाहेब कांबळे,रामभाऊ शिंदे,रेवननाथ माळी,माजी तंटामुक्ती अध्यक्ष राजेंद्र पारखे,बाबासाहेब येळे,डॉ. राम पवार, दादासाहेब माकोने,भगीरथ रेवाळे,सुनील थोरात, सचिन कांबळे,नितीन मासाळ,पत्रकार महेश मासाळ, तसेच अंगणवाडी मधील सेविका कोमल सागर पारखे,सविता दिलीप कांबळे,भीमा रावसाहेब कांबळे,उषा किशोर वेताळ,छाया कैलास पवार,प्रतिभा प्रकाश पारखे,सुनिता सुरेश बनसोडे,मनीषा गणपत बनसोडे,बाळासाहेब बनसोडे,यांच्यासह शाळेतील शिक्षक,शिक्षिका,शिक्षिकेतर कर्मचारी उपस्थित होते.