ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय या ठिकाणी रक्षाबंधन उत्साहात साजरे
वडाळा महादेव [ प्रतिनीधी राजेंद्र देसाई ] श्रीरामपूर येथील ब्रह्मकुमारी विश्वविद्यालय सेंटर या ठिकाणी रक्षाबंधन सण उत्सवा निमित्त विवीध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते यावेळी येथे भगिणी यांनी रक्षाबंधन मोठ्या उत्साहात साजरे केले
भाऊ बहिणीचे नाते अतूट तसेच घट्ट करणारा सण म्हणजेच रक्षाबंधन. या कार्यक्रम प्रसंगी प्रमुख उपस्थिती
ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय
प्रमुख संचालिका मंदादीदी, शिर्डी देवस्थान श्री साईबाबा संस्थानचे कार्याध्यक्ष श्री सचिन रंगराव गुजर , माजी आमदार भाऊसाहेब कांबळे साहेब श्रीरामपूर येथील उपमुख्य कार्याधिकारी
श्री आयुष आयर तसेच येथील प्रतिष्ठित व्यापारी श्री विनोद बोरसे सीनियर क्लार्क एस्टाब्लिश्ड डिपार्टमेंट
श्री राहुल खलीपे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. कार्यक्रम खूपच छान प्रकारे आणि पवित्र वातावरणामध्ये शिस्तबद्ध रीत्या पार पडला परमात्मा पित्याच्या दैवी उपदेशाचे पालन करून आपण सर्वांनी आपल्या विचारात शब्दात कृतीत आणि स्वप्नातही पूर्ण शुद्धता अंगीकारली पाहिजे अशी शिकवन संचालिका मंदादिदी यांनी उपस्थित बंधु यांना दिली आभार मा शिर्डी साईबाबा संस्थान विश्वस्त श्री सचिन गुजर मा आमदार भाऊसाहेब कांबळे साहेब यांनी मानले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!