वडाळा महादेव येथे पद्मश्री डॉ विठ्ठलराव विखे पाटील यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम संपन्न
वडाळा महादेव [ प्रतिनिधी — राजेंद्र देसाई ]
श्रीरामपूर तालुक्यातील वडाळा महादेव येथील ग्रामपंचायत कार्यालय व कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने पद्मश्री डॉ विठ्ठलराव विखे पाटील यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले यावेळी उपस्थित शेतकरी बांधवांना कृषी अधिकारी सौ छाया दुधाळे यांनी पद्मश्री डॉ विठ्ठलराव विखे पाटील यांच्या कार्याविषयी माहिती देत २९ ऑगस्ट पद्मश्री विखे पाटील यांचा जन्मदिवस असून त्याच्या कार्याचा गौरव म्हणुन २०१४ पासुन राज्यात शासणाने शेतकरी दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेऊन ठिकठिकाणी साजरा करण्यात येतो अशी माहिती कृषी अधिकारी यांनी उपस्थित शेतकरी बांधव यांना देत शेती विषयक मार्गदर्शन केले प्रसंगी ग्रामविकास अधिकारी नंदकुमार शेळके सामाजिक कार्यकर्ते रावसाहेब कसार भरत पवार सचिन पवार उपसरपंच
सौ सविताताई उघडे ज्येष्ठ मार्गदर्शक लक्ष्मण तात्या पवार सुरेश पवार शेतकरी संघटनेचे बबनराव उघडे विवीध कार्यकारी सोसायटी संचालक बाळासाहेब कसार बाळासाहेब बनसोडे सौ सुशिलाताई उघडे श्रीमती शिदुंबाई देसाई डॉ सुनिल जाधव राजेन्द्र गायकवाड सुनिल पवार अनिल राठोड रमेश दंवगे प्रदिप गायकवाड रावसाहेब उघडे भाऊ तेलोरे मनेश राठोड माधव तेलोरे शिवाजी चौधरी उपस्थित सर्वांचे रावसाहेब कसार यांनी आभार मानले