गुटख्याचा साठा करून विक्री करणारे ०२ आरोपी १,७८,१५०/-
रुपये किमतीचे मुद्देमालासह जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगरची कारवाई.

प्रतिनिधी -इमरान शेख

मा. श्री. राकेश ओला साहेब, पोलीस अधिक्षक, अहमदनगर यांनी पोनि/ श्री. दिनेश आहेर,
स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांना जिल्ह्यातील अवैध धंद्याची माहिती काढुन अवैध धंद्याचे समुळ
उच्चाटन करणेबाबत आदेश दिलेले आहेत.
नमुद आदेशान्वये पोनि / श्री. दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोहेकॉ/ अतुल लोटके,
पोकों/रोहित मिसाळ, पोकॉ/रणजित जाधव, पोकों/प्रशांत राठोड यांचे पथक तयार करुन त्यांना अवैध धंद्याची
माहिती काढून कारवाई करणेबाबत सुचना देवुन पथकास रवाना केले होते.
स्थानिक गुन्हे शाखेचे वरील पथक दिनांक २३/१२/२०२३ रोजी जामखेड पोलीस ठाणे हद्दीमध्ये अवैध
धंद्याची माहिती काढत असतांना पोनि श्री दिनेश आहेर यांना गुप्त बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की,
इसम नामे तौकीर पठाण रा. नुराणी कॉलनी, जामखेड हा त्याचे साथीदारासह महाराष्ट्र राज्यात विक्रीस
प्रतिबंध असलेला शरिरास अपायकारक होईल असा खाद्य पदार्थ पानमसाला गुटखा विक्रीकरीता आणुन
त्याचा त्याचे जामखेड येथील राहते घरामध्ये साठा करून ठेवला आहे अशी खात्रीशिर बातमी मिळाल्याने
पोनि/ दिनेश आहेर यांनी पथकास नमुद माहिती कळवून बातमीतील नमुद ठिकाणी जावुन खात्री करुन
कारवाई करणे बाबत आदेश दिले.
वरील पथकाने पंचासह बातमीतील ठिकाणी जावुन छापा टाकला असता सदर ठिकाणी दोन इसम
मिळुन आले. दोन्ही इसमांना ताब्यात घेवून त्यांना त्यांचे नांव गांव विचारता त्यांनी त्यांची नावे १) तौकीर
मुश्ताक पठाण वय २३ वर्षे, रा. नुराणी कॉलनी, जामखेड, जि. अहमदनगर, २) अमित अनिल भोसले
वय २४ वर्षे, रा. तपनेश्वर गल्ली, जामखडे, जि. अहमदनगर असे असल्याचे सांगितले. मिळुन आलेल्या
इसम नामे तोकीर पठाण याचे घराची पंचासमक्ष घरझडती घेता त्याचे घरझडतीमध्ये महाराष्ट्र राज्यात
विक्रीस व तयार करणेस बंदी असलेला हिरा, राजनिवास, गोवा, विमल कंपनीचा गुटखा पानमसाला
तसेच रॉयल ७१७, प्रिमीयम जेड एल ०१, व्ही. १ कंपनीची सुगंधीत तंबाखु व अॅक्टीवा मोटारसायकल
असा एकुण १,७८,१५०/- रुपये किमतीचा मुद्देमाल मिळुन आला आहे. वरील घरझडतीमध्ये मिळुन
आलेल्या मुद्देमालाबाबत त्यांचेकडे विचारपुस करता त्यांनी सदरचा गुटखा, पानमसाला हा अनिरुध्द उर्फ
नाना नारायण मुळे रा. घोडका, राजुरी जि. बीड याचेकडुन खरेदी केलेला असल्याचे सांगितले.

ताब्यात घेण्यात आलेल्या इसमांविरुध्द पोकॉ/२६०० रोहित मधुकर मिसाळ नेम स्थानिक
गुन्हे शाखा, अहमदनगर यांचे फिर्यादीवरुन जामखेड पोलीस स्टेशन गु.र.नं. ५९१/ २०२३ भादवि कलम
३२८, १८८, २७२, २७३, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास जामखेड पोलीस
स्टेशन करीत आहे..
सदरची कारवाई मा. श्री. राकेश ओला साो. पोलीस अधीक्षक, अहमदनगर, मा. श्री.
प्रशांत खैरे साहेब, अपर पोलीस अधिक्षक, अहमदनगर, मा. श्री. विवेकानंद वाखारे साहेब, उपविभागीय
पोलीस अधिकारी, कर्जत विभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस
अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!