एमआयएम पुर्ण ताकदीने सर्व निवडणूका लढविणार -शेख

श्रीरामपूर प्रतिनिधी :मुनीर सय्यद

ऑल इंडिया मज्लिस ए इत्तेहादूल मुस्लमिन(एम.आय.एम.) पुर्ण ताकदीने सर्व निवडणुका लढविणार असल्याचे श्रीरामपूर तालुकाध्यक्ष रफीक शेख यांनी सांगितले.

आमच्या प्रतिनिधींशी बोलताना पुढे तेअसेही म्हणाले की, लवकरच देशात लोकसभा निवडणूक होत अआहे सोबतच राज्याच्या विधानसभा निवडणुका देखील पुढे उभ्या ठाकल्या आहेत, या दोन्ही निवडणूकी सोबतच जिल्हा परिषद, पंचायत समिती,नगर पालिका, महानगर पालिका तसेच ग्रामपंचायती निवडणूका देखील एमआय एम पक्ष लढ़विणार असल्याचे पक्षश्रेष्टींचा आदेश असल्याने पक्षाचे राष्ट्रीयअध्यक्ष खा.बॅ. असदूद्दीन ओवैसी यांच्या नेतृत्वात तथा प्रदेशाध्यक्ष खा.इम्तियाज जलील यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वच्या सर्व निवडणुका पुर्ण ताकदीने लढविणारअसल्याचे देखील यावेळी ते म्हणाले,पक्षाच्या माध्यमातून जनसामान्यांच्या विविधज्वलंत प्रश्नंसाठी नेहमी अग्रेसर राहुन सातत्याने संघर्ष करणाच्या एम आय एम पक्षाला श्रीरामपूर तालुक्यात मोठे पोषक वातावरण निर्माण झालेले आहे.याकरीता विधानसभा निवडणूकीसह सर्वच निवडणूकालढविण्याचा पक्षाचा मानस असल्याचेही शेवटी श्री.शेख म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!