धर्मनाथबीज निमीत्ताने खोकर येथील श्रीक्षेत्र गोरक्षनाथ देवस्थान येथे
अखंड हरीनाम सप्ताह, नवनाथ ग्रंथ पारायण व गाथा पारायण

भोकर प्रतिनिधी-चंद्रकांत झूरंगे)

– श्रीरामपूर तालुक्यातील खोकर येथील श्रीक्षेत्र चैतन्य गोरक्षनाथ देवस्थान येथे धर्मनाथ बिज निमीत्ताने आयोजीत अखंड हरीनाम सप्ताह, नवनाथ ग्रंथ पारायण व जगद्गुरू तुकोबाराय गाथा पारायण सोहळ्यास रवीवार दि.4 फेब्रुवारी पासून आरंभ झाला असून या सोहळ्याची सांगता रवीवार दि.11 फेब्रुवारी रोजी येथल मठाधिपती भागवताचार्य सेवानाथ महाराज यांचे काल्याचे किर्तनाने सांगता होत असून या सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थीत राहुन लाभ घ्यावा असे आवाहन मठाधिपती सेवानाथ महाराज,समस्त ग्रामस्थ व भजनी मंडळ यांनी केले आहे.
खोकर गावचे आराध्य दैवत म्हणून प्रसिद्ध असलेले श्री क्षेत्र चैतन्य गोरक्षनाथ देवस्थान येथे सुरू झालेल्या या पारायण सोहळ्यात दररोज पहाटे 4 वा. काकडा,भजन, सकाळी 6 वा. गीतापाठ व विष्णुसहस्त्रनाम, सकाळी 8 वा. पारायण, दुपारी 12 वा. विविध सेवेकरी भाविकांचेवतीने हरीप्रसाद, सायंकाळी 5 वा. हरीपाठ, सायंकाळी 6.30 वा. जाहीर हरीकीर्तन व रात्री 8.30 वा.विविध मान्यवर भाविकांकडून हरीप्रसाद या प्रमाणे कार्यक्रम होत आहेत.
यात रवीवार दि.4 फेब्रुवारी रोजी श्रीक्षेत्र बाजाठाण येथील शिवगीरी आश्रमाचे संदिपान महाराज, सोमवार दि.5 फेब्रुवारी रोजी श्रीक्षेत्र गोंधवणी येथील ऋषीकेश महाराज वाक्चौरे, मंगळवार दि.6 फेब्रुवारी रोजी श्रीक्षेत्र आळंदी देवाची येथील आेंंकार महाराज शिंदे, बुधवार दि.7 फेब्रुवारी रोजी पिंपळवाडी येथील गोविंदगीरी आश्रमाचे नित्यानंदजी महाराज, गुरूवार दि.8 फेब्रुवारी रोजी खोसपुरी येथील ज्ञानेश्वर माऊली भिसे महाराज, शुक्रवार दि.9 फेब्रुवारी रोजी बाजाठाण येथील रामदरबार आश्रमाचे प्रेममुर्ती हरीशरणजी महाराज, शनीवार दि.10 फेब्रुवारी रोजी आळंदी देवाची येथील नवनाथ महाराज जयभाये यांचे जाहीर हरीकीर्तन होत आहे.
तर रवीवार दि.11 फेब्रुवारी रोजी सकाळी 6 वा श्रीगोरक्षनाथ महाराज यांचा अभिषेक, सकाळी 9 वा.खोकर येथील श्रीक्षेत्र गोरक्षनाथ देवस्थानचे मठाधिपती भागवताचार्य सेवानाथ महाराज यांचे काल्याचे किर्तन होत आहे, त्यानंतर श्रीचैतन्य गोरक्षनाथ देवस्थानचेवतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्याचे निमीत्ताने श्रीचैतन्य गोरक्षनाथ देवस्थानास खोकर येथील काळे परीवाराच्यावतीने साऊंंड सिस्टीम भेट देण्यात आली आहे.
या सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थीत राहुन लाभ घ्यावा असे आवाहन श्रीक्षेत्र चैतन्य गोरक्षनाथ देवस्थानचे मठाधिपती सेवानाथ महाराज, समस्त ग्रामस्थ व भजनी मंडळ खोकर यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!