वडाळा महादेव येथे तणनाशक औषध फवारणी केल्यावर सोयाबीनपिक गेले जळून

– शेतकरी वर्गांत संताप नुकसान भरपाईची केली मागणी

 

वडाळा महादेव [ प्रतिनिधी — राजेंद्र देसाई ]

 

श्रीरामपूर तालुक्यातील वडाळा महादेव येथील प्रगतशील शेतकरी सुनील भास्कर कसार तसेच सौ अनिता सुनील कसार सौ रंजना जयवंत कसार श्री जयवंत भास्कर कसार आदी शेतकरी यांनी वडाळा महादेव येथील गट नंबर १६ – तसेच गट नं ३०० यामध्ये साधारण ४ ते ५ एकरावर सोयाबीन पीक पेरणी केली असता शेतामध्ये तण उगवले असल्याने शेतकरी श्री सुनिल कसार यांनी खोकर फाट्यावरील मौनगीरी अँग्रो नेहमीचे औषधी व खताचे दुकान यांच्याकडे जाऊन संबंधित पिकाबाबत माहिती दिली व तणनाशकबाबत सल्ला मसलत करून दुकानदाराच्या सल्ल्यानुसार शाकेड तणनाशक औषध खरेदी केले यानंतर श्री कसार यांनी कुटुंबीयांच्या मदतीने शेतामध्ये शाकेड तणनाशक औषधीफवारणी केली यावेळी एक ते दोन दिवस वाट पाहिले असता सोयाबीन पिक करपून गेले असल्याचे श्री कासार यांच्या लक्षात आले घटनेची माहिती त्यांनी माजी सरपंच सर्जेराव कसार तसेच शेतकरी बांधव नातेवाईक यांना कळविली यावरून वडाळा महादेव येथुन शेतकरी वर्गातून श्री सुनील कसार यांच्या शेताकडे धाव घेऊन संबंधित सोयाबीन पिकाची पाहणी केली प्रसंगी सोयाबीन पिकाचे पूर्णपणे नुकसान झाल्याने संबंधित ग्रामस्थ शेतकरी यांनी औषधे दुकानदाराकडे चौकशी केली असता दुकानदाराकडुन उडवा उडवीचे उत्तर देण्यात आले यावेळी स्थानिक ग्रामस्थ यांनी घटनेची माहिती आमदार लहुजी कानडे यांना कळवीली तसेच घटनास्थळी मा अशोक कानडे यांनी भेट देऊन पाहणी केली तसेच संबधीत अधिकारी यांना माहिती दिली – यावरून संतप्त ग्रामस्थ शेतकरी यांनी कृषी अधिकारी तसेच संबंधित कंपनीकडे चौकशी केली परंतु शेतकरी श्री सुनील कसार यांना कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याने संतप्त ग्रामस्थ यांनी शेतकरी संघटना तसेच विविध संघटना यांना या विषयी माहिती दिली यावरून संबंधित शेतकरी यांना कुठलीही मदत न मिळाल्यास संबंधित दुकानदार व कंपनीच्या विरोधात तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा संतप्त शेतकरी वडाळा महादेव ग्रामस्थ तसेच विविध संघटने कडून देण्यात आला आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!