प्राईड अकॅडमी द्वारे लोकशाहीचा पाया सशक्त करण्याचे काम… तहसीलदार मिलिंदकुमार वाघ

तहसीलदार मिलिंदकुमार वाघ यांच्या हस्ते नूतन विद्यार्थी प्रतिनिधी पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा संपन्न

 

प्रतिनिधी — राजु काजी

टाकळीभान: प्राईड अकॅडमी सर्व गुण संपन्न विद्यार्थी घडवणारी अकॅडमी असून मतदानाद्वारे विद्यार्थी प्रतिनिधी निवड या कार्यक्रमाद्वारे प्राईड अकॅडमी द्वारे लोकशाहीचा पाया सशक्त करण्याचे काम होत आहे असे प्रतिपादन प्राईड अकॅडमी आयोजित विद्यार्थी प्रतिनिधी निवड व त्यांचा पदग्रहण सोहळा कार्यक्रम प्रसंगी श्रीरामपूरचे तहसीलदार मिलिंदकुमार वाघ यांनी केले. यावेळी कार्यक्रम प्रसंगी अध्यक्ष म्हणून तहसीलदार वाघ बोलत होते. याप्रसंगी प्राईड अकॅडमीच्या संचालिका मा.सभापती डॉ. वंदनाताई मुरकुटे , तालुका कृषी अधिकारी अविनाश चंदन, तालुका कृषी अधिकारी मीनाक्षी बडे, एडवोकेट मधुकरराव भोसले आदी प्रमुख उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना वाघ की येथे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा या दृष्टीने शिक्षण देण्यात येते ही कौतुकास्पद बाब असून शाळेत लोकशाही बद्दल जागृती करण्याचे काम होत असल्याबद्दल त्यांनी भरभरून कौतुक केले व नवीन पदग्रहण केलेल्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. तालुका कृषी अधिकारी अविनाश चंदन यांनी विद्यार्थ्यांना वृक्षारोपणाचे महत्त्व पटवून दिले. त्याप्रसंगी ऍड. माधवराव भोसले यांनी प्राईड अकॅडमी स्कूलच्या विविध उपक्रमांचे कौतुक केले. याप्रसंगी डॉ. वंदनाताई मुरकुटे यांनी शाळेत सर्व नवनवीन उपक्रम कोडींग भाषा उच्चार, शास्त्र याबद्दल विद्यार्थ्यांचा अभ्यास घेण्यात येत असल्याबद्दल सांगितले. शाळेचे मुख्याध्यापक विनोद जोशी सर यांनी शाळेची यशस्वी वाटचाल व शाळेच्या उपक्रम बद्दल थोडक्यात माहिती दिली. क्रीडा शिक्षक प्रदीप गोराणे सरांनी मैदानी उपक्रम यशस्वी पार पाडले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे मोलाचे योगदान लाभले व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्या लोखंडे यांनी केले तर कार्यक्रमाच्या उपस्थितीबद्दल सर्वांचे आभार एक्झिक्युटिव ऑफिसर प्रीती गोटे यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!