श्रीरामपूर जिल्हा करावा या मागणीसाठी
दि. १४ जुलै रोजी श्रीरामपूर बंदची हाक

 

श्रीरामपूर / प्रतिनिधी: दिपक कदम

स्वाभिमानी श्रीरामपूर जिल्हा कृती समितीच्या वतीने श्रीरामपूर जिल्हा करावा या मागणीसाठी स्वाभिमानी श्रीरामपूर जिल्हा कृती समितीचे अध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांच्या नेतृत्वाखाली प्रांताधिकारी कार्यालयावर भव्य निदर्शने करण्यात आले
यावेळी माजी नगराध्यक्षा अनुराधाताई आदीक म्हणाल्या श्रीरामपूर जिल्हा होण्यासाठी स्व. गोविंदराव आदिक यांनी श्रीरामपूरसाठी मूलभूत सुविधा उपलब्ध करून ठेवलेल्या आहेत, श्रीरामपूर जिल्हा व्हावा ही प्रत्येक श्रीरामपूरकरांचे स्वप्न आहे ते स्वप्न साकार करण्यासाठी स्वाभिमानी श्रीरामपूर जिल्हा कृती समितीने श्रीरामपूर जिल्ह्यासाठी जे जे आंदोलन होतील त्यामध्ये मी ताकदींनिशी उपस्थित राहील असेही त्या म्हणाल्या. यावेळी स्वाभिमानी श्रीरामपूर जिल्हा कृती समितीचे अध्यक्ष श्री. सुभाष त्रिभुवन म्हणाले की, श्रीरामपूर जिल्हा करावा ही गेली ४० वर्षापासून श्रीरामपूरकरांची मागणी आहे, परंतु राजकीय आकसापोटी श्रीरामपूर जिल्हा होण्यास अडथळा निर्माण केला जात आहे. म्हणून सरकारचे लक्ष वेधण्यासाठी श्रीरामपूरवर होत असलेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी येत्या रविवार दि. १४ जुलै रोजी श्रीरामपूर स्वयंस्फूर्तीन कडकडीत बंद ची हाक दिली आहे. प्रत्येक श्रीरामपूरकरांनी या बंदमध्ये सहभागी व्हावे असे आव्हानही त्यांनी यांनी केले. उपनगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे म्हणाले की, श्रीरामपूर जिल्हा करण्यासाठी सर्व गट तट विसरून श्रीरामपूरकर म्हणून एकजूट आपल्याला दाखवावी लागेल, कामगार नेते नागेश सावंत म्हणाले की, श्रीरामपूर जिल्हा करण्यासाठी आपल्याला उग्र स्वरूपाचे आंदोलन छडावे लागेल, स्वाभिमानी श्रीरामपूर जिल्हा कृती समितीचे कार्याध्यक्ष बाबा शिंदे म्हणाले की सत्तेमध्ये असलेल्या कार्यकर्त्यांनी आपली ताकद वापरून श्रीरामपूर जिल्हा करण्यासाठी सरकारला भाग पाडावे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अरुण पाटील नाईक म्हणाले की, श्रीरामपूर जिल्ह्यासाठी आमदार लहू कानडे यांना सांगून विधानसभेत तारांकित प्रश्न उपस्थित करायला सांगेन, शिवसेनेचे सचिन बडदे म्हणाले आपल्याला आंदोलनाबरोबर सरकारी दप्तरही कागदपत्री भांडावे लागेल, प्रशांत लोखंडे म्हणाले की, श्रीरामपूर जिल्ह्याच्या प्रश्नासाठी मी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे त्यांची वेळ घेऊन स्वाभिमानी श्रीरामपूर जिल्हा कृती समितीच्या शिष्टमंडळाची चर्चा घडवून आणेल. श्रीरामपूर मर्चंट असोसिएशनचे संजय कासलीवाल म्हणाले की, आपण जर श्रीरामपूर जिल्हा होण्यासाठी एक जूट दाखवली नाही तर श्रीरामपूर भकास होण्यास वेळ लागणार नाही, यावेळी आम आदमी पार्टीचे तिलक डूंगरवाल म्हणाले की, स्वाभिमानी श्रीरामपूर जिल्हा कृती समितीचा लढा सातत्याने चालू आहे, त्याला नक्की यश मिळेल, यावेळी श्रीरामपूर मर्चंट असोसिएशन अध्यक्ष मुकेश कोठारी, राहुल मुथा,प्रवीण गुलाटी,अशोक उपाध्ये, उमेश पवार,गौतम उपाध्ये, संतोष बत्रा, योगेश ओझा, अभिजीत लिप्टे, बाळासाहेब चांडोळे, शरद शेरकर,निलेश बोरावके, रियाज खान पठाण, सतीश कुदळे, डॉ. संजय नवथर, अमोल साबणे, नितीन कापसे, अनिल तलोज, ऍड. संदीप चोरगे, आदित्य आदिक, अविनाश पोहेकर, अनिरुद्ध भिंगारवाला,शुभम लोळगे, आबासाहेब औताडे, प्रवीण फरगडे, मच्छिंद्र साळुंखे,वामन लचके,सुरेश ठुबे, दीपक कदम, अनिल चांडवले, हरेश भटेजा, संदीप धिवर, नितीन जाधव, अल्ताफ शेख, रमेश अमोलिक व सर्वपक्षीय नेते तसेच व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पत्रकार दिपक कदम, श्रीरामपूर 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!