श्री श्री रविशंकर विद्या मंदिर शाळेत जिल्हास्तरीय योगासन स्पर्धा संपन्न.
वडाळा महादेव [ प्रतिनिधी -राजेंद्र देसाई ]
श्रीरामपूर तालुक्यातील वडाळा महादेव येथील श्री श्री रविशंकर विद्या मंदिर शाळेत जिल्हास्तरीय योगासन स्पर्धा संपन्न झाल्या आहे
यावेळी आर्ट ऑफ लिविंग संस्थेचे धर्मगुरू स्वामी अच्युत महाराज यांनी दीप प्रज्वलन करून स्पर्धकांना धार्मिक अध्यात्मिक तसेच योगासनाबद्दल माहिती देऊन शुभेच्छा व्यक्त केल्या
येथील श्री श्री रविशंकर विद्यामंदिर शाळेने उत्कृष्ट रीत्या आयोजन केल्याबद्दल अहमदनगर जिल्हा योगासन स्पोर्ट्स असोसिएशन सचिव उमेश झोटिंग सर यांनी
श्री श्री रविशंकर विद्या मंदिर शाळेचे व सर्व समिती सदस्यांचे आभार व्यक्त केले तसेच भविष्यात विभागीय शालेय योगासन स्पर्धा आयोजित करणार असल्याचे सांगितले
ही स्पर्धा यशस्वी करण्याकरता संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संदीप कसार राहुल विसपुते मुख्याध्यापिका भाग्यश्री आघाडे ज्ञानेश्वरी तुंगार समिती सदस्य देवा भाई चौधरी रचना फासाटे संदिप तरटे यांनी विशेष परिश्रम घेतले या स्पर्धेचे उद्घाटन श्री श्री रविशंकर विद्या मंदिर ट्रस्टचे ऑडिटर श्री विद्या मॅडम यांनी केले स्पर्धेचे पंच म्हणून उमेश झोटिंग प्रणिता तरोटे प्रवीण पाटील आप्पा लाडाने अक्षता गुंड पाटील काजल ताजने विष्णू कुलकर्णी यांनी काम पाहिले यापुढेही श्री श्री रविशंकर विद्या मंदिर शाळा योगाच्या प्रचार व प्रसारासाठी काम करणार असल्याची माहिती संदीप कसार सर यांनी दिली