गंगेचे जल घेवुन आलेल्या युवकाचे बेलापुरात जोरदार स्वागत

बेलापुर (प्रतिनिधी देवीदास देसाई)

-श्रावण महिन्यातील दुसऱ्या सोमवारी श्री हरिहर केशव गोविंद भगवानांच्या जलाभिषेकासाठी पुणतांबा येथुन गंगेचे पाणी घेवुन आलेल्या कावडीचे बेलापुर ग्रामस्थ व भाविकांच्या वतीने पारंपारिक वाद्याच्या जयघोषात जल्लोषात स्वागत करण्यात आले. बेलापुरचे ग्रामदैवत श्री हरिहर केशव गोविंद भगवान यांना श्रावणातील दुसऱ्या सोमवारी पुणतांबा येथुन पवित्र गंगेचे जल आणुन श्री हरिहर केशव गोविंद भगवानांचा अभिषेक करण्याची परंपरा आहे. या ही वर्षी गावातील तरुण गंगाजल आणण्यासाठी पुणतांबा येथे गेले होते .तेथुन जल घेवुन पायी चालत पहाटे साडेचार वाजता ते बेलापुरातील विजय स्तंभाजवळ पोहोचले .बाजार सामितीचे उपसभापती अभिषेक खंडागळे,पत्रकार देविदास देसाई, विष्णूपंत डावरे, तंटामूक्ती अध्यक्ष बाळासाहेब दाणी,विशाल आंबेकर,राधेशाम आंबीलवादे राजेंद्र राशिनकर,प्रदेश तेली महासंघाचे जिल्हाध्यक्ष एकनाथ नागले आदिनी कावडीचे स्वागत केले.त्यानंतर बँण्ड पथकाच्या जयघोषात श्री हरिहरकेशव गोविंद मंदिरापर्यत मिरवणूक काढण्यात आली.गावातील महीला भगीनींनी जागोजागी सडा रांगोळी काढल्या तसेच पवित्र जल घेवुन आलेल्या कावडी धारकांची आरती करुन जल पुजन करण्यात आले.त्यानंतर पवित्र गंगेच्या जलाने भगवान श्री हरिहर केशव गोवींदाना अभिषेक घालण्यात आला.त्यानंतर महाआरती करण्यात आली.बऱ्याच वर्षानंतर अशा प्रकारे जल घेवुन आलेल्या युवकांचे स्वागत ग्रामस्थाच्या वतीने करण्यात आल्याचे पाहुन गंगेचे जल घेवुन आलेल्या तरुणांचा उत्साह वाढला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!